मेट्रोत हात लागल्यामुळे महिला प्रवाशांमध्ये जोरदार बाचाबाची
इंग्रजीत सुरु झालेले भांडण गेले हिंदीवर, भांडणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल
दिल्ली – दिल्ली मेट्रो ही देशातील सर्वात मोठी मेट्रो सेवा आहे. दिल्ली मेट्रोमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र मेट्रोतील वाढणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांमध्ये वादाचं प्रमाणही वाढलं आहे. या वादाचे अनेक व्हिडीओ देखील समोर येत असतात. असाच दोन महिलांमध्ये जागेवरुन झालेल्या वादाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
ट्रेन असो वा मेट्रो, लोक कधी कधी सीटसाठी भांडत असतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, एका मेट्रोमध्ये दोन महिला हात लागला म्हणून भांडत आहेत.सीटवर बसण्यावरून दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला, त्याचे रूपांतर शिवीगाळात झाले. व्हिडीओत सुरुवातीला दोघी इंग्रजीत एकमेकांशी भांडताना दिसतात, पण काही वेळातच वाद हिंदी भाषेत वळतो. ज्यामध्ये महिला एकमेकांना तू-तू-मैं-मैं करत शिवीगाळ केली. एकमेकींना हात लागत असल्यामुळे हा वाद सुरु झाला होता. मेट्रोतील काही प्रवाशांनी हा वाद मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन सोशल मिडीयावर व्हायरल केला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्या वागणुकीवर हटके प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली मेट्रो ही त्याच्या मेट्रो सेवेमुळे नव्हे तर त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. दिल्ली मेट्रोमध्ये बसण्याच्या जागेवरुन होणारे वाद चिंतेचा विषय बनत चालले आहेत. सध्या मेट्रोतील हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.