
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या त्या व्हिडिओची जोरदार चर्चा
व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल, अभिनेत्रीबरोबर दिली ही हिंट, नेमके काय घडले
मुंबई – श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्रद्धाचा मोठा चाहतावर्ग आहे. श्रद्धा कपूर तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आता ही अभिनेत्री एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओत सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती विचित्र डान्स करताना दिसतेय. एका व्हिडिओमध्ये तिनं वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ शेअर केले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत तिनं ‘दिल पे चलाई छुरियाँ’ गाणं लावलं आहे. त्याचबरोबर, ‘माझा वेडेपणा कोण रोखू शकतं का?’ असं कॅप्शन लिहिलं आहे. श्रद्धाचा हा व्हिडिओ चर्चेत आलाय. कारण, श्रद्धा डान्स करतेय त्या व्हिडिओमध्ये तिच्या पाठीमागे एक व्यक्ती बसलेली दिसतेय. ही व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध निर्माता राहुल मोदी आहे. राहुल मोदी आणि श्रद्धा कपूर हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, अद्याप या दोघांनीदेखील यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. ते त्यांचे नाते कधी उघड करणार, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. श्रद्धा कपूर हिने २०१० साली ‘Teen Patti’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यात ती महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली होती. ‘आशिकी 2’मधून तिला खरी ओळख मिळाली होती. श्रद्धा २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’मध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला होता.
श्रद्धा ही तिच्या स्टाईल, सिंपल लूक आणि ट्रेंडी फॅशनमुळे तरुणींमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. तिच्या इंस्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.श्रद्धा कपूर ही प्रसिद्ध खलनायक अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी आहे. तिची आई शिवांगी कपूर प्रसिद्ध गायिका आहेत.