
शिंदे आणि अजित दादांच्या पक्षातील ‘या’ मंत्र्यांचा राजीनामा घेणार
महायुतीतील वादाचा शिंदे आणि दादांच्या मंत्र्यांना फटका, दादा आणि शिंदे या मंत्र्यांवर नाराज, नेमके कारण काय?
मुंबई – राज्यात सध्या महायुतीचे सरकार सत्तेत आहे. पण भाजप सोडल्यास एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मंत्री सतत वादात अडकत आहेत. त्यामुळे ते विरोधकाच्या कायम निशाण्यावर राहिले आहेत, पण आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना गंभीर इशारा देत काम करण्यास सांगितले आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लक्षात घेत आपल्या मंत्र्यांना पक्षवाढीकडे लक्ष देण्यास सांगितले होते. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची कॅबिनेटच्या बैठकीनंतर एक गुप्त बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्र्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. तर अजित पवार यांनीही नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी मंत्र्यांची कानउघाडणी केली आहे. त्यांनी जिल्ह्यात न येणाऱ्या पालकमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना तीन दिवस मुंबईत, एक दिवस मतदारसंघात आणि तीन दिवस पक्षवाधीचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. ते मंत्री असे करणार नाहीत, त्यांनी खुर्ची खाली करावी, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे, तर एकनाथ शिंदे यांनी सोमवार ते बुधवार कॅबिनेटनंतर मतदार संघात उपस्थित राहण्याबाबत मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा शिंदे यांनी दिला आहे. मंत्री कामच करणार नसतील तर त्यांच्याबाबत येत्या काळात विचार करावा लागेल, असा दमच शिंदे यांनी बैठकीप्रसंगी भरला आहे.
महायुतीत भाजप आपल्या मित्रपक्षावर नेहमीच दाबावाचे राजकारण करत आलेला आहे. आताही आगामी निवडणूका लक्षात घेत पक्षवाढीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवाडीच्या पालकमंत्र्यांवर देखील कुरघोडी करत आहे, पण या दोन पक्षात मात्र कोणताही उत्साह दिसत नाही, त्यामुळे आगामी काळात काही मंत्र्यांची विकेट जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.