
महाराष्ट्रातील ‘हे’ आमदार आहेत देशातील श्रीमंत आमदार
देशातील सर्वात श्रीमंत आणि गरीब आमदारांची यादी जाहीर, पहा महाराष्ट्रातील कोणते आमदार?
दिल्ली – असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरने भारतातील सर्वात श्रीमंत आमदारांचा ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात देशातील श्रीमंत आमदारामध्ये दक्षिणेतील राज्यांनी आघाडी घेतली आहे. दक्षिणेकडील सर्वाधिक आमदार श्रीमंत आहेत.
एडीआरने जाहीर केलेल्या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत आणि गरीब आमदार भाजपाचेच आहेत. सर्वात श्रीमंत आणि सर्वात कमी श्रीमंत आमदारांमध्ये ३३८२ कोटी रुपयांपेक्षा जास्त फरक आहे. निवडणूक लढवण्यापूर्वी प्रत्येक नेता प्रतिज्ञापत्रावर आपली मालमत्ता जाहीर करतो. हा एडीआर अहवाल त्यावर आधारित आहे. यात देशातील ४०९२ आमदारांच्या संपत्तीचे विश्लेषण करण्यात आले आहे. यादीनुसार महाराष्ट्रातल्या घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार पराग शाह हे देशातील सगळ्यात श्रीमंत आमदार आहेत. पराग शाह यांची संपत्ती तब्बल ३३८३ कोटी रुपये एवढी आहे.
सर्वात श्रीमंत १० आमदार
१. पराग शहा (भाजप, महाराष्ट्र) – ३३८३ कोटी
२. डी.के. शिवकुमार (काँग्रेस, कर्नाटक) – १४१३ कोटी
३. के.एच. पुट्टास्वामी गौडा (स्वतंत्र, कर्नाटक) – १२६७ कोटी
४. प्रियकृष्ण (काँग्रेस, कर्नाटक) – ११५६ कोटी
५. एन. चंद्राबाबू नायडू (टीडीपी, आंध्र प्रदेश) – ९३१ कोटी
६. पोंगुरु नारायण (टीडीपी, आंध्र प्रदेश) – ८२४ कोटी.
7. वाय.एस. जगन मोहन रेड्डी (वायएसआरसीपी, आंध्र प्रदेश) – ७५७ कोटी.
8. व्ही. प्रशांती रेड्डी (टीडीपी, आंध्र प्रदेश) – ७१६ कोटी.
९. जयंतीभाई सोमाभाई पटेल (भाजप, गुजरात) – ६६१ कोटी.
१०. सुरेश बी.एस. (काँग्रेस, कर्नाटक) – ६४८ कोटी.
सर्वात गरीब १० आमदार
१. निर्मल कुमार धारा (भाजप, पश्चिम बंगाल) – १७०० रु.
२. नरिंदर पाल सिंग सावना (आप, पंजाब) – रु. १८,३७०रु.
३. नरिंदर कौर भाराज (आप, पंजाब) – रु. २४,४०९ रु.
४. मेहराज मलिक (आप, जम्मू आणि काश्मीर) – २९,०७० रु
५. पुंडरीकाक्ष्य साहा (AITC, पश्चिम बंगाल) – ३०,४२३ रु
६. अनिल कुमार अनिल प्रधान (एसपी, उत्तर प्रदेश) – ३०,४९६ रु
७. संजली मुर्मू (भाजप, ओडिशा) – रु. ३५,०७६ रु.
८. चंदना बौरी (भाजप, पश्चिम बंगाल) – ६२,२९६ रु
९. नंदिता देबबरमा (टिपरा मोथा, त्रिपुरा) – ६३,००० रु
१०. रामवृक्ष सदा (आरजेडी, बिहार) – ७०,००० रु