Latest Marathi News
Ganesh J GIF

‘हे’ दोन बडे नेते अजित पवार आणि भाजपची साथ सोडणार ! ठाकरेंच्या शिवसेना गटात आज करणार प्रवेश

विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठी इन्कमिंग सुरु असतानाच आता शिवसेना ठाकरे गटातही पक्ष प्रवेश वाढताना दिसत आहेत. अजित पवार आणि भाजपची साथ सोडून आज दोन बडे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कोकणातील भाजप नेते राजन तेली, सांगोल्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दीपक आबा साळुंखे आणि चिंचवड येथील मोरेश्वर भोंडवे हे नेते आज मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत.राजन तेली हे भाजपचे सावंतवाडी मतदारसंघातील बडे नेते असून त्यांनी दिपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा लढवण्यासाठी ठाकरे गटाचा मार्ग निवडला आहे. आज सायंकाळी पाच वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

दुसरीकडे सांगोल्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे यांचा संध्याकाळी चार वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार आहे. सांगोल्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला होता. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दीपक आबा साळुंखे हे शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत. चिंचवड येथील अजित पवार गटाचे मोरेश्वर भोंडवे यांचा सहा वाजता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!