
विधानसभेत मुख्यमंत्र्यांना भिडल्या या महिला आमदार
सत्ताधारी भाजपाची केली बोलती बंद, अर्थव्यवस्थेवरून मुख्यमंत्र्यांना सुनावले, कोण आहेत त्या?
उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या कुंभमेळ्यात दररोज लाखो भाविक सहभागी होत आहेत. कुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. पण त्यांना एका महिला आमदाराने प्रश्न विचारून कोंडीत पकडले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेच्या बजेट सत्रमध्ये समाजवादी पक्षावर कडाडून टीका केली. समाजवादी पक्षाच्या खासदार रागिनी सोनकर यांच्या आर्थिक संबंधित प्रश्नावर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले. पण यामुळे योगिंना दखल घ्यायला लावणा-या रागिनी सोनकर कदाचित पहिल्याच आमदार ठरल्या आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी समाजवादी पक्षाच्या आमदार रागिनी सोनकर यांनी प्रश्नांचा भडीमार करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सळो की पळो करुन सोडले होते. अर्थव्यवस्थेपासून ते इन्कम टॅक्स या महत्वाच्या विषयावर त्यांनी योगींना अडचणीत टाकणारे प्रश्न उपस्थित केले होते. योगींना त्यांच्यासाठी उत्तरे द्यावी लागली. योगींना भिडणा-या रागिनी यांनी नेत्र चिकित्सक म्हणून डिग्री मिळवली. यानंतर त्यांनी अनेक दिवस कोलकाता येथील रुग्णालयात काम केले आहे. सोनकर यांनी समाजवादी पक्षाकडून जौनपूर जिल्ह्यातील मच्छली शहर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मच्छली शहर मतदारसंघातून त्यांनी भाजपाचे मेहीलाल गौतम यांचा ८४८४ मतांनी पराभव करत विजय मिळवला. यानंतर त्या खूप चर्चेत आल्या होत्या. व्यवसायाने डॉक्टर असलेले संबित मलिक यांच्याशी रागिनीने लग्न केले आहे. सध्या रागिनी सोनकर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने १० वर्षांत ६ कोटी लोकांना गरिबीतून वाचवले आहे. केवळ महाकुंभाच्या आयोजनामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत ३ लाख कोटी रुपयांची वाढ होणार आहे, असा दावा योगी अदित्यनाथ यांनी केला आहे. पण सोनकर यांनी भाजपाची चांगलीच गोची केली होती.