Latest Marathi News
Ganesh J GIF

ते म्हणाले तू असे करायला नको होते, पण ठीक आहे, हरकत नाही

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या त्या सीनमुळे पालकांनी व्यक्त केली नाराजी, नॅशनल क्रश असणारी अभिनेत्री म्हणाली मी काहीही चुकीचे....

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये तुफान कमाई करत असलेला अॅनिमल चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटातील हिंसा आणि इंटिमेट सीनवर सध्या जोरदार वाद होत आहेत. अगदी संसदेत देखील या चित्रपटावर चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील अभिनयासाठी अभिनेते रणवीर कपूर आणि स्मृती मंधानापेक्षा तृप्ती डिमरीची जोरदार चर्चा होत आहे. आता तृप्ती डिमरीला नॅशनल क्रश म्हटलं जात आहे. पण यातच तृप्तीने आपल्या आई वडीलांबाबत एक धक्कादायक विधान केले आहे.

तृप्ती डिमरीचे चित्रपटातील ‘न्यूड सीन्स’ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चित्रपटानंतर सोशल मीडियावर देखील तिच्या फॅन फॉलोईंगमध्ये तुफान वाढ झाली आहे. सगळीकडे तिचं कौतुक होत असताना तृप्तीचे आईवडील मात्र या सीन्सवर नाराज झाले असल्याचा खुलासा केला आहे. तिने याबाबत बोलताना सांगितले की, माझ्या आई-बाबांना हे पाहून थोडा धक्का बसला. ते म्हणाले, ‘आम्ही आजवर चित्रपटांमध्ये असं काही पाहिलं नाही आणि आज तू ते केलंस.’ त्यांना तो सीन पाहून सावरायला त्यांना थोडा वेळ लागला. पण ते माझ्यासोबत खूप चांगले वागले. परंतु याविषयी बोलताना माझे पालक माझ्यासाठी खूप गोड बोलत होते. ते म्हणाले की तू असे करायला नको होते, पण ठीक आहे, हरकत नाही. पालक या नात्याने आपल्याला हे नक्कीच वाटेल. मी त्यांना सांगितले की मी काहीही चुकीचे करत नाही. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी आरामदायी आणि सुरक्षित आहे तोपर्यंत मला त्यात कोणतीही अडचण दिसत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि मी साकारलेल्या पात्राप्रती मी १०० टक्के प्रामाणिक असले पाहिजे आणि मी तेच केले. दरम्यान याआधी तृप्ती डिमरीने सांगितले होते की, इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान सेटवर फक्त पाच लोकांनाच बसण्याची परवानगी होती. शूटिंगदरम्यान रणबीर तृप्तीला अस्वस्थ आहे की नाही हे वारंवार तपासत होता. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत चित्रपटाने ६०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. तर या सिनेमामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रकाशझोतात आली असून ती सातत्याने चर्चेत येत आहे.

तृप्तीने लैला मजनू चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय ‘बुलबुल’,’कला’ या सिनेमांनी तिला लोकप्रियता दिली होती. पण ‘अ‍ॅनिमल’ मुळे ती स्टार झाली आहे. तृप्ती लवकरच ‘मास महाराजा’ मधून साऊथमध्ये डेब्यू करणार आहे. तर ‘मेरे महबूब मेरे सनम’ मध्ये ती विकी कौशलसोबत दिसणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!