Latest Marathi News

ही अभिनेत्री म्हणाली तेंव्हा मी रोज मरत होते

अभिनेत्रीच्या धक्कादायक खुलाशाने खळबळ, बघा अभिनेत्रीसोबत काय झाल

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- आपल्या मोहक अदांनी आणि जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे निक्की तांबोळी. पण निक्कीने बिग बाॅसमधुन बाहेर पडल्यानंतर धक्कादायक खुलासा करत मी रोज मरत होते असा खुलासा करत खळबळ उडवून दिली आहे. आपण खुप तणावात होतो असे देखील ती म्हणाली आहे.


निक्की तांबोळीने एका ठिकाणी खुलासा करताना म्हणाली की, “‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर मला अनेक ऑफर आल्या, पण मी योग्य निर्णय घेण्याच्या स्थितीत नव्हते. भावाला गमावल्याच्या दुःखाशी झुंज देताना, ही गेली दोन वर्षे खूप कठीण गेली आहेत. मी तुटले होते आणि माझ्या भावाची आठवण करून सकारात्मक राहणे कठीण होते. हजारो लोकांमध्ये हसायचे, पण आतून मरत होते” असे सांगितले आहे. निक्की तांबोळीचा भाऊ जतिन तांबोळीचे ४ मे २०२ रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. त्याच्या निधनानंतर ती प्रचंड तणावात होती. “वेळ निघून जाते, पण त्याने मागे सोडलेल्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर येत राहतात. असे सांगत अजूनही तीने आपल्या भावाला विसरू शकत नसल्याचे सांगितले अधोरेखीत केले आहे.


निक्की तांबोळीने साऊथच्या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून निक्कीची ओळख आहे.तसेच ती वेगवेगळ्या लुकमध्ये आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.तिचे चाहते तिच्या फोटोंना पसंत करत असतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!