Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपाच्या या महिला आमदाराचा ब्रिटनच्या संसदेत डंका!

मानाचा 'भारत गौरव पुरस्कार', पती मंत्रालयातील बडे अधिकारी, पुण्यातील या गावाशी खास नाते

परभणी दि २३(प्रतिनिधी)- लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा ‘भारत गौरव पुरस्कार’ यंदा जिंतूरच्या भाजप आमदार मेघना साकोरे – बोर्डीकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या निवडीमुळे बोर्डीकर यांच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ब्रिटनच्या संसदेत हा सन्मान सोहळा पार पडला. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायत्री परिवाराचे मुख्य चिन्मय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ब्रिटिश संसदेत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात वेदांता ग्रुपचे सीएमडी डॉ. नरेश त्रेहान, जेट एअरवेजचे अंकित जालान, जिनिव्हा येथील शास्त्रज्ञ सीईआरएन अर्चना शर्मा, पोलंड येथील अमित लाथ यांच्यासह जपान, उझबेकिस्तान, भारत, यूएसए, युके, युरोप, न्यूझीलंड, फ्रान्ससह जगभरातील तब्बल वीस देशातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीयांना हा पुरस्कार ब्रिटिश संसदेत वितरण करण्यात आला. आमदार मेघना बोर्डीकर यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने मेघना बोर्डिकर यांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केले जात होते. मेघना साकोरे- बोर्डीकर यांना जाहीर झाल्याचे समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला होता. मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे सामाजिक कार्य, विकासाप्रती बांधिलकी, कर्तव्यपूर्तीची भावना, पर्यावरणासाठी त्यांनी केलेले कार्य यामुळे देशाच्या सामाजिक आणि भौतिक विकासात त्यांनी भर घातल्याचे कळवत आयोजकांनी त्यांना ब्रिटिश संसदेत होणाऱ्या या पुरस्काराच्या वितरणासाठी सन्मानपूर्वक आमंत्रण दिले होते. मागील दहा वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. या आधी ‘भारत गौरव पुरस्कार’ आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, चित्रपट कलाकार मनोज कुमार, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, जगातील सर्वात प्रभावशाली महिला श्रीमती इंदिरा नूयी, जैन संत पुलक सागर, आचार्य लोकेश मुनी, गुगलचे सीईओ संजय गुप्ता, दिवंगत मेजर ध्यानचंद, जीमेलचे शिवा अय्यादुराई, स्व. निरजा भानोत, प्रेरक वक्ते गौर गोपालदास, सीमा तापडिया यांना देण्यात आला आहे.

मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचेमाजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आहेत. २०१९ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली. जिंतूर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडूण आल्या. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर गावातील साकोरे कुटुंबातील त्या सूनबाई आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!