
बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने धावत्या लोकलमधून मारली उडी
अभिनेत्री गंभीर जखमी, पाठीला डोक्याला गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
मुंबई – हिंदी सिनेमाविश्वातील एका अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. तिचा अपघात झाल्याचं तिने पोस्टमधून सांगितलं असून, तिला गंभीर दुखापत झाली आहे. अभिनेत्री करिष्मा शर्माने पोस्टमधून फोटोही शेअर केले आहेत. यामुळे तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.
करिश्मा चालत्या ट्रेनमधून पडून जखमी झाली आहे. लोकल ट्रेनमधून चर्चगेटला जाताना तिने स्वत: ट्रेनमधून उडी मारली. हा किस्सा तिने स्वत: सोशल मिडियावर पोस्ट करून सांगितला आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिने सगळा घटनाक्रम लिहिला आहे. ती लिहिते, ‘काल चर्चगेटला एका शूटिंगसाठी जात असताना मी साडी नेसली होती. तशातच मी ट्रेन पकडण्याचा निर्णय घेतला. मी ट्रेनमध्ये चढले ही. पण माझ्यासोबत असलेल्या मित्र- मैत्रिणींना धावत ट्रेन पकडायला जमली नाही. त्यामुळे मी धावत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यामुळे माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. माझ्या पाठीला मार लागला आहे. माझ्या डोक्याला सूजही आली आहे. डॉक्टरांनी एमआरआय करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे डोक्याला किती मार लागला आहे याचा अंदाज येईल. कालपासून मला प्रचंड त्रास होतो आहे. पण मी धैर्य ठेवले आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. करिश्माला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीची तपासणी करून MRI केली आहे. डोक्यावरील दुखापतीमुळे तिला काही काळ रुग्णालयात ठेवण्यात येईल. तिच्या तब्येतीविषयी ऐकून चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, आपल्या बोल्ड अंदाजामुळे आणि ग्लॅमरस लूकमुळे करिष्मा कायम चर्चेत राहिली आहे. करिश्माच्या या अपघातामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ती पुन्हा नव्या जोमाने प्रेक्षकांसमोर यावी, अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतूनही व्यक्त केली जात आहे.
करिश्मा शर्मा ही बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती २०१३ पासून सतत मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. २०१४ मध्ये झी टीव्हीच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने अभिनयाची सुरुवात केली. या मालिकेत ती पिया अर्जुन किर्लोस्करच्या भूमिकेत होती. त्यानंतर ती ‘एमटीवी वेब्ड’, ‘प्यार तूने किया किया’, ‘ये है मोहब्बतें’, ‘सिलसिला प्यार का’ आणि ‘कॉमेडी सर्कस’, ‘द कपिल शर्मा शो’ सारख्या विनोदी कार्यक्रमांमध्ये दिसली होती.