
ही प्रसिद्ध अभिनेत्री पडली उद्योगपतीच्या प्रेमात?
ते फोटो समोर आल्याने चर्चांना उधान, क्रिकेट सामन्यात झाले स्पाॅट, कोण आहे तो
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री क्रिती सेनन आणि उद्योगपती कबीर बाहिया यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच दोघांचाही एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लॉर्ड्सवर भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. अक्षय कुमराही पत्नीसोबत पोहोचला होता. तर क्रिती सेननही बॉयफ्रेंड कबीर बहियासोबत मॅच बघायला आली होती. कबीरनेच क्रितीसोबतचा स्टेडियमवरील सेल्फी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. क्रितीला जवळ घेऊन मागे स्टेडियमचा नजारा दाखवत त्याने फोटो काढला आहे. दोघंही यामध्ये एकदम स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत. याआधीही क्रिती आणि कबीर अनेकदा सोबत दिसले आहेत. त्यांच्या एकत्रित व्हेकेशनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. क्रितीने मात्र कबीरसोबतचं नातं कधीच जाहीररित्या मान्य केलं नाही. कबीर बहियाचं एम एस धोनीशीही जवळचं नातं आहे. धोनीची पत्नी साक्षीच्या तो नात्यातला आहे. अनेकदा धोनीच्या कुटुंबासोबतही कबीर आणि क्रितीचे फोटो समोर आले आहेत. कबीर बाहियाने स्वतः क्रिती सेननसोबत सामन्यादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. कबीरने त्याच्या इंस्टाग्रामवरून दोघांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये क्रिती कबीरसोबत उभी असल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. याआधीही क्रिती आणि कबीर यांना अनेकवेळा एकत्र पाहिले गेले आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे भाष्य केलेले नाही. पण त्यांच्या अफेअरच्या चर्चांना आता या फोटोंमुळे उधाण आले आहे.
कबीर बहिया हा एक ब्रिटीश व्यापारी असून त्याने आपले शालेय शिक्षण इंग्लंडमधील बोर्डिंग स्कूलमधून केले आहे. तो वर्ल्डवाइड एव्हिएशन अँड टुरिझम लिमिटेडचे संस्थापक देखील आहे. यूके स्थित ट्रॅव्हल एजन्सी साउथॉल ट्रॅव्हलचे मालक कुलजिंदर बहिया यांचा तो मुलगा आहे.