
या प्रसिद्ध अभिनेत्रीला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी
या अभिनेत्याचे समर्थन करत दिली धमकी, अभिनेत्रीला धक्का, नाराजी व्यक्त करत तक्रार दाखल, म्हणाली....
मुंबई – आजच्या जमान्यात कोणाच्या भावना कशाने दुखावल्या जातील, हे सांगणे खूपच अवघड आहे, त्यातच आता ट्रोलिंगचे प्रमाण खुपच वाढले आता बॉलिवूड अभिनेत्री आहाना कुमरा हिला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
आहानाला पवन सिंहच्या चाहत्यांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रिअॅलिटी शो “राईज अँड फॉल” मध्ये आहाना आणि भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांच्यात मतभेद झाले होते. त्या प्रसंगानंतर सोशल मीडियावर तिच्याविरुद्ध प्रचंड ट्रोलिंग सुरू झाले. “शो संपल्यानंतर मला पवन सिंहच्या चाहत्यांकडून अत्यंत घृणास्पद आणि भयावह संदेश मिळू लागले. काहींनी तर मला मृत्यूची आणि बलात्काराची धमकी दिली, “मी शोमधून बाहेर पडल्यावर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. माझ्याकडे शेकडो धमकीचे मॅसेज आले. काही लोक इतका द्वेष का बाळगतात, हे समजण्याच्या पलीकडचं आहे. आपण कोणत्या काळात जगतोय आणि आपल्या आजूबाजूला काय घडतयं यामध्ये फरक आहे, असे अभिनेत्री म्हणाली आहे. आहाना कुमराने सांगितले, मी सर्व धमक्यांचे स्क्रीनशॉट काढून शोच्या निर्मात्यांना आणि टीमला पाठवले आहेत. “टीमने मला आश्वासन दिलं की अशा गोष्टींवर कारवाई केली जाईल. दरम्यान अभिनेत्रीची आणि पवन सिंहची काही कारणावरून भांडणं झाली होती. त्याबद्दल शोमध्येच तिने त्याच्याबरोबरचे मतभेद मिटवले असले तरीही आहानाला ऑनलाइन ट्रोलिंग आणि टीकेचा सामना करावा लागत आहे.
आहानाच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘कॉल माय एजंट’, ‘एजंट राघव’, ‘बेताल’, ‘इंडिया लॉकडाऊन’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर अभिनेत्री शेवटची ‘सलाम वेंकी’ या सिनेमात शेवटची झळकली होती. शो मधून बाहेर पडल्यानंतर सध्या ती नवीन प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहे.