ही प्रसिद्ध अभिनेत्री ‘या’ व्यक्तीसोबत होती रिलेशनमध्ये
अभिनेत्रीने गुपित उघडे केल्याने नेटकरी सुसाट, चाहत्यांची उत्सुकता वाढली
मुंबई दि २(प्रतिनिधी)- अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तर आहेच पण अभिनयाबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिकाही आहे. आता तर तिने व्यवसायात पदार्पण करत ‘प्राजक्तराज’ नावाचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे. पण सध्या तिची एक पोस्ट व्हायरल होत आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या खाजगी आयुष्याबाबत एक खुलासा केला आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका कार्यक्रमात तिने आपल्या रिलेशनबाबत मोठा खुलासा केला आहे. राजश्री मराठीच्या एका मुलाखतीत प्राजक्ता माळीला “तू शेवटचं डेट कधी केलं आहेस? असा प्रश्न विचारण्यात आला होता.या प्रश्नाचे उत्तर देत प्राजक्ता म्हणाली मी साडे चार वर्षांपूर्वी शेवटचं डेट केलं आहे. तिच्या या उत्तराने तो कोण याची उत्सुकता वाढली आहे. त्याचबरोबर शेवटची शिवी तू कधी दिली? असं तिला विचारण्यात आलं. यावर प्राजक्ताने, “मी शेवटची शिवी ‘रानबाजार’ वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यान दिली होती असे सांगितले आहे.
प्राजक्ताचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. ती अनेकदा आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तर प्राजक्ताच्या फोटो आणि व्हिडिओवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत असतात. आता तिच्या खुलाशाने उत्सुकता वाढली आहे.