Latest Marathi News
Ganesh J GIF

या व्हायरल व्हिडिओमुळे ही प्रसिद्ध अभिनेत्री प्रचंड संतापली

प्रायव्हसीचा भंग करणारी कृती म्हणत सुनावले, खाजगी गोष्टीचा उल्लेख करत म्हणाली, तर तो एक गुन्हा आहे...

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण परवानगीशिवाय फोटो पोस्ट केल्याने आलिया भटने नाराजी व्यक्त केली.सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही नाराजी व्यक्त केली आहे.

आलिया आणि रणबीर सध्या एका नवीन व्हिडिओमध्ये चर्चेत आली आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे , त्यात दोघांचा नवीन बंगला दिसत आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या घराचं काम आता पूर्ण होत आलं आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, सहा मजली बंगल्याची एक झलक दिसते. समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असलेला हा बंगला अत्यंत भव्य आणि सुंदर दिसतोय. घराच्या सजावटीकडे रणबीर आणि आलियाने स्वतः लक्ष दिलं होतं. प्रत्येक मजल्यावरील बाल्कनीमध्ये झाडे लावण्यात आली आहे. रणबीर-आलियाच्या या नव्या घराच्या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. त्यांच्या ड्रीम होमची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आलिया म्हणाली, ”माझे म्हणणं तुम्हाला समजले असेल की, मुंबईसारख्या शहरात जागा मर्यादित आहे. कधीकधी तुमच्या खिडकीतून तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे घर असते. पण याचा अर्थ असा नाही की, कोणालाही तुमच्या खाजगी घराचा व्हिडिओ बनवण्याचा आणि ते ऑनलाइन प्रसिद्ध करण्याचा अधिकार आहे. आमच्या घराचा, जे अजूनही बांधकाम सुरू आहे, त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो आमच्या परवानगीशिवाय अनेक माध्यमांनी प्रसारित केला आहे. आमच्या प्रायव्हसीचा भंग करणारी ही कृती आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने ही एक गंभीर समस्या आहे. परवानगीशिवाय कोणाच्याही खाजगी जागेचे व्हिडिओ किंवा फोटो काढणे हा content नाही, तर तो एक गुन्हा आहे. ही कृती सामान्य मानली जाऊ शकत नाही. कृपया विचार करा, तुमच्या घराच्या आतील भागाचे व्हिडिओ तुमच्या परवानगीशिवाय सार्वजनिकपणे शेअर केलेले तुम्हाला आवडतील का? आपल्यापैकी कोणालाही ते आवडणार नाही, असे म्हणत तिने ते व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले आहे.

आलिया सध्या रणबीर कपूर, विकी कौशलसोबत ‘लव्ह अँड वॉर’ या सिनेमाचं शूटिंग करत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रणबीर आणि आलिया या घरात शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आलिया-रणबीरने लग्नगाठ बांधली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!