‘ही’ प्रसिद्धी अभिनेत्री अभिनयाला करणार अलविदा?
अभिनेत्रीच्या निर्णयाने चाहत्यांना धक्का, 'या' दिवशी प्रदर्शित होणार शेवटचा चित्रपट?
चेन्नई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे किर्ती सुरेश अलिकडेच बॉयफ्रेंड अँटनी थैटिलसोबत लग्न करून आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. पण लग्नानंतर लगेच किर्तीच्या एका निर्णयाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
लग्नानंतर अभिनेत्री किर्ती अभिनयातून ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे. किर्तीने आतापर्यंत फक्त दोनच चित्रपट साइन केले आहेत. ‘रिव्हॉल्व्हर रिटा’ आणि ‘कांनिवाडी’ या चित्रपटात ती दिसणार आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्रीने इतर कोणत्याही प्रकल्पाची घोषणा केलेली नाही, ज्यामुळे ती कदाचित चित्रपटांपासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण किर्तीने आत्तापर्यंत अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. किर्तीने बॉयफ्रेंड अँटोनी थाटीलसोबत नुकतीच हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे. लग्नानंतर काही दिवसांनी किर्ती पहिल्यांदाच तिच्या आगामी ‘बेबी जॉन’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली होती. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पारंपरिक थाली म्हणजेचं तमिळमधील मंगळसूत्र आणि तिच्या ग्लॅमरस वेस्टर्न लूकमुळे तिच्या स्टाईलचे कौतुक झाले होते. ‘बेबी जॉन’मधून ती बॉलिवूड एन्ट्री करत आहे. त्यामुळे तिचे चाहते तिच्यासाठी खूप उत्सुक आहेत. वरुण धवन यामध्ये तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत असणार आहे. दरम्यान किर्तीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘गीतांजली’ या मल्याळम चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आता ती तामिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनेत्री कीर्ती सुरेश गेल्या अनेक वर्षांपासून अँटनी थाटीलला डेट करत होती. अगदी काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर अँटनी थाटीलबरोबर एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टच्या माध्यमातून किर्तीने त्यांच्या नात्याची कबुली दिली. किर्ती सुरेश ही दाक्षिणात्य चित्रपट निर्माते जी सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी आहे.