
‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?
घटस्फोटाच्या आठ वर्षानंतर अभिनेत्रीला लग्नाचे वेध, घटस्फोटाचे समर्थन म्हणाली मला नेहमीच माझे लग्न आवडेल पण....
मुंबई – मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता तिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. तिनं दुसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तिचा मुलगा आता मोठा झाला आहे. तरी प्रसिद्ध अभिनेत्रीला दुसरे लग्न करायचे आहे.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा विवाह १९९८ मध्ये झाला होता. त्यावेळी मलायकाचं वय २५ वर्षे होतं. पाच वर्षे डेट केल्यावर त्यांनी लग्न केलं आणि २००२ साली त्यांचा मुलगा अरहानचा जन्म झाला. १८ वर्षांच्या संसारानंतर २०१६ मध्ये ते वेगळे झाले आणि २०१७ मध्ये त्यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला. त्यावेळी अरहान फक्त १५ वर्षांचा होता. “घटस्फोट कठीण आहे. आयुष्य कसं जगायचं आणि आयुष्यात काय करावं, याबद्दल बरेच लोक आपली मत मांडतात… पण, मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की नाती कधीकधी खूप नाजूक असतात. माझं लग्न कायम टिकावं असं मला वाटत होतं, पण तसं झालं नाही. याचा अर्थ असा नाही की माझा प्रेमावरील विश्वास उडाला आहे. दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला माझं दुसरं लग्न नेहमीच आवडेल, पण जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनी मला प्रश्न विचारला. ‘पण आज मी आनंदी आहे. मी हा निर्णय घेतल्याबद्दल मला आनंद आहे. जेव्हा मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला स्वार्थी म्हटलं गेलं. पण मी कायम स्वतःला प्राधान्य दिलं. समाज म्हणतो की आधी तुम्ही तुमच्या मुलाचा, पतीचा आणि नंतर स्वतःचा विचार केला पाहिजे. पण मी आधी स्वतःचा विचार केला. आज मी पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आहे.’ असं देखील मलायका म्हणाली. अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यातील नात्यात दुरावा आला आहे का अशी देखील चर्चा अधूनमधून होत असते. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी मलायका एका मिस्ट्रीमॅनसोबत दिसली होती. त्यामुळे मलायका कोणाबरोबर लग्न करणार याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे.
मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.