बाॅलीवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री वेळेआधीच झाली आई
सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली गुडन्युज, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव,बघा खास पोस्ट
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधली आघाडीची अभिनेत्री दीपिका कक्करच्या घरी आनंदाचे आगमन झाले आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दीपिका कक्करच्या पतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे नियोजित तारखेच्या आधीच अभिनेत्री आई झाली आहे.
अभिनेत्री दीपिका कक्कर मागील अनेक दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. दीपिकाचा पती शोएह इब्राहिमने इंस्टाग्रामवरुन माहिती दिली आहे. शोएब इब्राहिमने आपल्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने इंस्टा स्टोरीवर सांगितलं की, “२१ जून रोजी सकाळी आमच्या घरी एका मुलाने जन्म घेतला आहे. हे बाळ प्रिमॅच्यूअर जन्माला आले आहे. घाबरण्याची किंवा काशजी करण्याची काहीही गरज नाही. तुमच्या प्रार्थना सोबत राहोत.” दीपिका आणि इब्राहिमने लग्न २०१८ साली झाले होते. दीपिका कक्करचे हे दुसरे लग्न होते. शोएबच्या आधी तिने २०११ मध्ये रौनक मेहताशी लग्न केले, पण २०१५ मध्ये दोघे वेगळे झाले होते. दीपिकाने २०१० मध्ये ‘नीर भरे तेरे नैना देवी’ या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केलं होते. दीपिका कक्कर यापूर्वी ‘कहां हम कहां तुम’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत ती अभिनेता करण ग्रोवरसोबत दिसली होती. यात दीपिकाने सोनाक्षी ही भूमिका साकारली होती. या व्यतिरिक्त दीपिकाने ‘ससुराल सुमर का 2’मध्ये देखील कॅमियो केला होता. दीपिकाने मालिकांव्यतिरिक्त हिंदी टेलिव्हिजनवरील रियालिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. दीपिका ‘बिग बॉस १२’ ची विजेती आहे. दिपिका कक्कर आणि शोएबने या वर्षी जानेवारीमध्ये प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. आता त्यांच्या घरात चिमुकला पाहुणा आला आहे.
आता दीपिका आणि शोएबचे चाहते नव्यानेच पालक बनलेल्या या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. दिपिकाने प्रीमॅच्युअर अर्थात वेळेआधीच बाळाला जन्म दिला आहे. डॉक्टरांनी तिला जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्याची डिलिव्हरी तारीख दिली होती. परंतु, आज २१ जून रोजीच दीपिकाने बाळाला जन्म दिला आहे.