
ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार या खासदारांची सुनबाई
अभिनेत्रीची ती पोस्ट चर्चेत, कमेंटचा पाऊस, म्हणाली 'अपने रंग मे मुझको रंग दे...'
कोल्हापूर – चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचे खुप जुने नाते राहिलेले आहे. अनेकजण चित्रपटसृष्टीतून राजकारणात आले आहेत. तर अनेकांनी एकमेकांची जीवनसाधी म्हणून निवड केली आहे. आता आणखी एक जोडी चर्चेत आली आहे. लवकरच एक अभिनेत्री खासदार पुत्राबरोबर लग्न करण्याची शक्यता आहे.
धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी दोन दिवसापुर्वी अभिनेत्री रिंकू राजगुरुसोबत एक फोटो पोस्ट केला होता. त्याची बरीच चर्चा झाली होती. पण आता रिंकूची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. रिंकूने तिचा एकटीचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोला तिनं “ओ रंगरेझ.. अपने रंग मे मुझको रंग दे” हे गाणं लावलं. तिच्या या स्टोरीवरुन चाहत्यांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिंकुने यात गोल्डन अशा पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच तिच्या कपाळावर अर्धचंद्र टिकली असून त्या खाली कुंकू दिसत आहे. या फोटोत रिंकूची नजर खाली झुकलेली आहे. नेमका हाच ड्रेस कृष्णराज बरोबरच्या फोटोत दिसत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कृष्णराज आपल्या युट्यूब अकाऊंटवरुन लग्नाचा विचार करत असल्याची चर्चा आणि त्याचा एक व्हिडीओ केला होता. यानंतर हा फोटो आल्यामुळे रिंकू आणि कृष्णराज यांचं लग्न होणार आहे का? अशी चर्चा रंगली आहे, पण अद्याप यावर कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान कृष्णराज महाडिक म्हणाला, माझी सर्वांनी विनंती आहे, माझ्या फोटोमुळे गैरसमज करुन घेऊ नका. त्या माझ्या एक चांगल्या मैत्रिण आहेत. त्या कोल्हापुरात सहज एका कार्यक्रम होता, म्हणून आल्या होत्या. त्या दरम्यान आमची भेट झाली. आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.
सैराट’ चित्रपटातून एकाच रात्रीत प्रकाशझोतात आलेली आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरू ओळखली जाते. सध्या दोघेही सोशल मिडीयावर चर्चेत आहेत.