Latest Marathi News
Ganesh J GIF

हगवणे बाप लेकाला लपण्यासाठी या मंत्र्याने केली मदत

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, या हाँटेलात होता शाही मुक्काम

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबातील सर्व सदस्य सध्या जेलमध्ये आहेत. मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे आणि मुलाला वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तब्बल ८ दिवसांनी अटक करण्यात आली. पण आता या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे फरार होते. त्यांना २३ मेला अटक करण्यात आली. पण आता केलेल्या चाैकशीत मागील आठवडाभर ते कोठे कोठे फिरले याची माहिती समोर आली आहे. आणि या प्रकरणात माजी मंत्री आणि त्यांच्या मुलाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. कर्नाटक काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटीलने हेरिटेज रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणेंसाठी बूकिंग केलं होतं. लग्नाच्या निमित्ताने माझे पाहुणे येणार असल्याचं सांगत या रूम बूक करण्यात आल्या होत्या. त्यात राजेंद्र हगवणे आणि दोन साथीदार राहिले होते. १९ मे रोजी मध्यरात्री रिसॉर्टमध्ये पोहोचले. २१ मे रोजी ते रिसॉर्टमधून बाहेर पडले. राजेंद्र हगवणे आणि त्यांचे साथीदार दिवसभर बाहेरच असायचे, फक्त झोपायला ते रिसॉर्टमध्ये येत होते अशी माहिती समोर आली आहे. राजेंद्र हगवणे आठवड्याभरात ३ गाड्या बदलून पुण्यासह सातारा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात फिरत होता. १७ मे रोजी राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता. तेव्हाच का अटक केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार झाले काही काळ ते मावळातील फाॅर्महाऊसवर गेले. तेथून आळंदीतील लाॅजवर देखील त्यांनी मुक्काम केला. पोलिसांनी केलेल्या तपासात थार, इंडेव्हर, आणि बलेनो अशा आलिशान गाड्यांमधून त्यांनी प्रवास केला होता. या दरम्यान एका हाॅटेलमध्ये मटन पार्टी केल्याचेही समोर आले होते. बावधन पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुहूर्त लॉन्स येथे छापा टाकून राजेंद्र आणि सुशील यांना अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, या दोघांनी फरार होण्यासाठी अनेक गाड्या आणि ठिकाणे बदलली, परंतु पोलिसांनी त्यांचा माग काढत अखेरीस त्यांना पकडले. या अटकेमुळे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.

राजेंद्र हगवणे आणि प्रीतम पाटील यांची घोडे पाळण्यातून मैत्री झाली होती. अनेकदा त्यांच्या भेटीगाठी होत असत असे म्हटले जात आहे. या संदर्भात वीरकुमार पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनी या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नव्हती आणि म्हणून त्यांचं बुकिंग केलं अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!