Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे जिल्ह्यातील ‘या’ शाळा बंद होणार?

राज्य सरकारच्या निर्णयाचा फटका, पहा सविस्तर यादी

पुणे दि १३ (प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा कमी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे २० पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांची माहिती ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेकडे मागितली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक शाळा बंद होण्याची शक्यता आहे. या निर्णयाला विरोध केला जात आहे.

कमी पट संख्येच्या शाळा बंदचा निर्णय झाल्यास, पुणे जिल्ह्यातील १४ हजार ८६५ विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ शाळांना कायमचे मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्यांना इतर शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. या निर्णयाने पुणे जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असणार आहे. शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील एक हजार ५४ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. या सर्व शाळा द्विशिक्षकी असल्याने, त्या बंद झाल्यास दोन हजार १०८ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील झेडपीच्या शाळांची संख्याही कमी होऊन दोन हजार ६८५ इतकी राहणार आहे. या निर्णयाला विरोध देखील केला जात आहे.

अतिरिक्त ठरणारे शिक्षक २,१०८
वीस विद्यार्थ्यांच्या आतील तालुकानिहाय शाळा
आंबेगाव -९६
बारामती -३९
भोर -१४३
दौंड -३८
हवेली -२१
इंदापूर -५३
जुन्नर -८५
खेड -१२८
मावळ -८८
मुळशी -११९
पुरंदर -६६
शिरूर – ८४
वेल्हे -९४

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!