
ही तरुण अभिनेत्री पडली ७० वर्ष अभिनेत्याच्या प्रेमात
सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हणाली, 'प्रेमाला कोणतेही वयाचे बंधन व मर्यादा नसते'
मुंबई – मुंबईमध्ये आपण अनेक नवीन जोड्या बनताना आणि तुटताना पाहत असतो. आताही अशीच एक जोडी चर्चेत आली आहे.
कारण एका आता एका तरूण अभिनेत्रीने आपल्यापेक्षा ४०वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे तो अभिनेता आता ७० वर्षाचा आहे.
प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव यांच्यासोबतचा फोटो अभिनेत्री शिवांगी वर्मा हिने इंस्टाग्रामवर शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. प्रेमाला कोणतेही वयाचे बंधन नाही व कोणतीही मर्यादा नसते, असे म्हणत शिवांगीने गोविंद नामदेव यांच्यासोबतचा खांद्यावर हात ठेवलेला फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. दरम्यान अभिनेत्री शिवांगी वर्मा लवकरच गोविंद नामदेव यांच्यासोबत चित्रपटात झळकणार आहे. दोघेही कलाकार एका कॉमेडी चित्रपटात सोबत काम करताना दिसतील. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्रीने हा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे शिवांगी वर्माचा ही पोस्ट पब्लिसिटी स्टंट असू शकतो. दरम्यान शिवांगीने पोस्ट केल्यानंतर काही लोक अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. एकाने कमेंट केली, “म्हणूनच पैसा महत्त्वाचा आहे,” तर दुसऱ्याने विचारलं, “तुमचा बॉयफ्रेंड आहे का?” शिवांगी वर्माच्या काही चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करत ‘तुम्ही लग्न करणार आहात का?’ दुसऱ्या युजर त्यांच्या फोटोची खिल्ली उडवत म्हणाला, ‘पैसा असेल तर वय नसते, मर्यादा नसते.’ दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या फोटोला ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
गोविंदा नामदेव हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘बँडिट क्वीन’, ‘सरफरोश’, ‘सत्या’ यांसारख्या चित्रपटांमुळे ते प्रसिद्ध आहेत.
https://www.instagram.com/p/DDjSyMDy1D6/?igsh=MWJpaDZwcGZ4YmVwcg=