
नेपाळमध्ये सरकारविरोधात आंदोलनात पण ही तरुणी जोरदार ट्रोल
तरुणाईचा सरकारवर रोष मग ही तरुणी का आली निशाण्यावर, फॉलोअर्स घटले, कारण काय?
दिल्ली – नेपाळच्या तरुणांनी एकत्र येत तेथील सरकार उलथवून लावलं आहे. तिथे नव्या सरकारची स्थापना झाली आहे. तेथील तरुणांनी संसद, पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्र्यांची निवासस्थाने पेटवून दिली आहेत. पण एक तरुणी यामुळे जोरदार ट्रोल झाली आहे.
नेपाळमधील आंदोलनाची धग कायम आहे. त्यामुळे देशभरातील परिस्थिती बिकट आहे. नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे जेनझेड तरुणाई रस्त्यावर उतरली होती. त्यावेळी घराणेशाही आणि सरकारमधील भ्रष्टाचार यावर देखील तरुणाई आक्रमक झाली होती. नेपाळमधील तरुणाई श्रिंखलावर सर्वाधिक टीका करत आहेत. आंदोलन सुरु असताना सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स घटले आहेत. त्यांची संख्या १ लाखांनी कमी झाली आहे. श्रिंखला खातीवाडानं २०१८ मध्ये मिस वर्ल्डच्या व्यासपीठावर देशाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. ती पहिल्या १२ स्पर्धकांमध्ये पोहोचली होती. आर्किटेक्ट ते मॉडेल असा प्रवास करणाऱ्या श्रिंखलानं त्यावेळी मुलांच्या शिक्षणाबद्दल आग्रही भूमिका मांडली होती. तेव्हा देशवासीयांना तिच्याबद्दल अभिमान वाटला होता. श्रृंखला खातीवाडा ही मीस नेपाळ वर्ल्ड राहिलेली आहे. तिच्या ग्लॅमरस लुकवर तेथील अनेक तरुण फिदा आहेत. तिचे राहणीमानही उच्च दर्जाचे आहे. तिलाच आता सर्वाधिक ट्रोल केले जात आहे. श्रृंखला नेपाळचे माजी आरोग्यमंत्री बिरोध खातीवाडा यांची मुलगी आहे. महागडे कपडे, उच्च दर्जाचे राहणीमान, परदेश यात्रा यामुळे आता तिला ट्रोल केल जात आहे. नेपाळमध्ये तिला नेपो किड मानले जात आहे. त्यामुळेच नेपाळच्या तरुणांमध्ये तिच्याविरोधात राग आहे. तसेच तिने देशात सुरू असलेल्या जनआंदोलनावर एक शब्दही उच्चारला नाही. “मुलांच्या शिक्षणाची वकिली करणार म्हणत होती, पण आज आंदोलनात मार खाणाऱ्या तरुणांविषयी एक शब्दही काढला नाही”, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. दरम्यान शृंखलाने २०१८ मध्ये मिस नेपाळचा खिताब जिंकला होता. यानंतर तिने मिस वर्ल्ड स्पर्धेत देशाचं प्रतिनिधीत्व केलं होत. तिथे तिनं ब्युटी विथ द पर्पस पुरस्कार पटकावला होता. पण आंदोलनामुळे तिचे फॉलोअर्स देखील कमी झाले आहेत.
सात वर्षांपूर्वी कौतुकाचा विषय ठरलेली श्रिंखला आता टिकेची धनी ठरली आहे. तिचा उल्लेख सोशल मीडियावर नेपो किड असा होत आहे. हा शब्द नेपाळी नेत्यांच्या मुलांसाठी वापरला जात आहे.