रायपूर दि २० (प्रतिनिधी)- सध्या सोशल मीडियावर एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात काही तरुणींना एका तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. एवढंच नाही तर मारहाण करताना त्यांनी त्या पुरुषाचे कपडेही फाडले. रायपूर विमानतळावरील हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रायपूर विमानतळाबाहेर एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणाऱ्या तरुणींनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे.तरुणाने मॅनेजरचा नंबर विचारल्यावर तरुणींचा त्याच्याबरोबर वाद झाला. त्यामुळे तरूणाला मारहाण करण्यात आली आहे. तरुणींनी तरुणाला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. एक तरुणीने तर बेल्टने मारहाण केली आहे. यादरम्यान शिवीगाळही करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
#Raipur #AAI @aairprairport @RaipurPoliceCG
What is happening in the airport, where is the security of airport….? Really shameless some girls are beating one person freely…?
Hopefully Raipur Police will take strict action against such incident. pic.twitter.com/wxQcn1G3cC
— Chandrashekhar Dewangan (@chandrak0809) September 18, 2022
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच, अशा पद्धतीने कुणाला मारहाण करणे चुकीचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. रायपूर पोलिसांनी तरुणींवर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.