Latest Marathi News
Ganesh J GIF

फेस्टिव्ह इवेंट 2022 मध्ये विद्यार्थिनींनी सादर केल्या विविध कला

पुणे दि २० (प्रतिनिधी)- ग्रेस लेडीज ग्लोबल संघटना, सिंगापूर /यु. एस. ए . आणि रिता इंडिया फाऊंडेशन, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेस्टिव्ह इव्हेंट 2022 चे आयोजन करण्यात आले होते.  ज्यामध्ये सहभाग घेत 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनींनी त्यांच्या विविध कला सादर केल्या. हा कार्यक्रम शनिवारी (दि.17) डॉ . कलमाडी शामराव हायस्कूल,  कन्नड माध्यम , एरंडवणे येथे आयोजीत करण्यात आला होता.

 

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रिता शेटीया (रिता इंडीया फाउंडेशनच्या संस्थापिका आणि ग्रेस लेडीज ग्लोबल संघटनेच्या राजदूत) आणि एच. सी . डॉ. सविता शेटीया  (ग्रेस लेडीज ग्लोबल संघटनेच्या क्लब मेंबर) यांनी केले.

 

शाळेचे प्रिन्सिपल चंद्रकांत हारकूडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शिक्षिका विल्मा मार्टीस , श्रेया हब्बू , उषा मोरे , शोभा पंचांगमठ, पूजा पुजारी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.  शिक्षकेत्तर बसप्पा जवारी आणि मनीषा परदेशी यांनी सभागृह व  तांत्रिक व्यवस्था सांभाळली. काही विद्यार्थ्यांनी उत्साहाने  फोटोशूट आणि  व्हिडीओ काढण्यात मदत केली. कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक सदानंद तावरगेरी सीमा कुचेरिया आणि रुपाली रणावरे – जाधव उपस्थित होते.

 

या फेस्टिव्ह इव्हेंट ची थीम होती, ‘गर्ल’स एम्पॉव्हरमेंट’. या थीमवर आधारित मुलींमध्ये असलेल्या नॉन अकॅडमिक पॅशन म्हणजेच दिया डेकोरेशन, राखी मेकिंग, रांगोळी, मेहंदी , होम डेकॉर, ग्रीटिंग कार्ड, ड्रॉईंग आणि फॅशन शो या 8 कॅटेगरी चा समावेश होता.(Festive event 2022) विद्यार्थिनीन मधील सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांना आणि शाळेला ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता . या मधील सहभागासाठी विद्यार्थिनीना  ग्रेस लेडीज ग्लोबल संघटनेकडून प्रमाणपत्र देण्यात आले.

फॅशन शो मध्ये एकूण 89 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.  फॅशन शो ची थीम होती, ‘वॉक विथ कॉन्फिडन्स. ग्रेस लेडीज च्या फॅशन शो मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी होणारी ही पहिलीच शाळा.(Festive event 2022)  विद्यार्थिनींना याद्वारे स्टेज वरती येऊन स्वतःला आत्मविश्वासाने सादर करत आजच्या घडामोडी विषयी प्रश्न विचारण्यात आले. आणि यातूनच विनर्स ची निवड करण्यात आली. विद्यार्थीनीनी या सर्व कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि या सर्व विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्याचे काम सर्व विद्यार्थ्यांनी केले.

या कार्यक्रमाचे बक्षिसांचे प्रायोजकत्व सुहासिनी बिवलकर (सामाजिक कार्यकर्त्या ) आणि  आचार्य डॉ. योगेश कुमार (अस्ट्रोयोग चे संस्थापक) यांनी केले.(Festive event 2022) या मध्ये प्रत्येक कॅटेगरी मधील 3 विजेत्या मुलींना असे एकूण 26 बक्षिसे प्रायोजकत्व स्वीकारलेल्या पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विल्मा मार्टीस यांनी केले

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!