Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटातील ‘या’ आमदाराला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी

इंस्टाग्राम अकाउंटवरून शिविगाळ करत आमदाराच्या मुलालाही धमकी, कारण काय? राजकीय वर्तुळात खळबळ

जालना – शिवसेना शिंदे गटातील जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांच्याविरुद्ध अश्लील शिवीगाळ करत, त्यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे जालन्यात खळबळ उडाली आहे. अभिमन्यू खोतकर यांनी यासंदर्भात जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. धमकी प्रकरणी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली असून आपण अशा धमक्यांना घाबरत नाही. अलीकडच्या काळात सट्टा, मटका,आयपीएल आणि जमिनी घोटाळे उघड केल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत असून आम्ही सर्व काही हलक्यात घेत नाही. सर्वांचा बंदोबस्त करू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षातील आमदारांना धमकी देण्याचा प्रमाणात अलीकडे मोठी वाढ झाली आहे.

पोलीस तपास वेगाने सुरू खोतकर पिता पुत्राला धमकीचा मेसेज आल्यानंतर अभिमन्यू खोतकर यांनी यासंदर्भात जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी तातडीने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!