अनैतिक संबंधातून गरोदर असल्याचे सांगत तरूणाला धमकावले
महिलेची तरूणाला धमकी, गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तरुणावर अत्याचार, हडपसर पोलीसात गुन्हा दाखल
पुणे दि ६(प्रतिनिधी)- एका महिलेने शारीरिक संबंधांची माहिती घरच्यांना सांगते, तर कधी गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत युवकाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार डिसेंबर २०१९ ते २८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान हडपसरमध्ये घडला आहे.
याबाबत लोहगाव येथे राहणाऱ्या ३५ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर येथील महिलेवर विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी महिलेची ओळख झाल्यानंतर त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर महिलेने फिर्यादी यांना वारंवार फोन करुन भेटण्यासाठी बोलावून घेत असे. फिर्यादी भेटण्यास गेला नाही तर त्यांना शारीरिक संबंधाची माहिती घरच्यांना देणार असल्याची धमकी दिली. तसेच आपण गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वारंवार पैसे घेतले. तसेच हे प्रकरण मिटवायचे असेल तर एक रक्कमी २० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर कायदेशीर कारवाई करेन असे सांगून नोकरी घालवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यानंतर संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धमकीच्या त्रासाला कंटाळून तरूणाने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या संबधित अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.