Latest Marathi News
Ganesh J GIF

फुरसुंगीत एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

या कारणामुळे उचलले टोकाचे पाऊल, वडिलांचा मृत्यू, पुणे हादरले

पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. आई वडील आणि मुलाने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हडपसर मध्ये हा प्रकार घडला आहे. यात दुर्देवाने वडिलांचा मृत्यू झाला आहे.

हडपसर परिसरातील फुरसुंगी येथील भोसले व्हिलेजमधील लक्ष्मी निवासमध्ये राहणार्‍या कुटूंबातील तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सूर्यप्रकाश अबनावे, चेतन अबनावे, आणि जनाबाई अबनावे अशी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्यांची नावे आहेत. यात सूर्यप्रकाश अबनावे यांचा मृत्यू झाला आहे. कॅन्सर सारख्या आजाराला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. चेतन अबनावे हा स्वतः आजारी असायचा त्याला अनेक वेळा फीट येत असत. शिवाय त्याच्या आईला कॅन्सर होता. आज संध्याकाळी तिघांनी हडपसर येथील राहत्या घरी जेवणातून विषप्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात वडिलांचा मृत्यू झाला तर आई आणि मुलगा हे शेजारच्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत.

शेजारी राहत असलेल्या नागरिकांना घटनेची माहिती मिळताच तातडीने सर्वांना रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांना सूर्यप्रकाश यांना मृत घोषित केलं चेतन आणि जनाबाई यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!