पुणे दि २९(प्रतिनिधी)- हडपसरमध्ये भल्या पहाटे
भीषण अपघात झाला आहे. यात एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला.सोलापूर रस्त्यावर हा अपघात झाला आहे.स्कूटीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंटचा मिक्सरचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला. रवीदर्शनसमोरील लक्झरी आणि एसटी बसच्या थांब्यावर पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला, अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.
रिक्षाचालकांसह स्थानिकांनी जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघात झालेले ठिकाण पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहे. वारंवार या ठिकाणी किरकोळ अपघात होतात. मात्र त्यावर उपाय म्हणून पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात जात नाही. मात्र पोलिसांकडून फक्त बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचे असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.माहितीनुसार सोलापूरवरून भरधाव वेगाने हा कॉन्क्रिट मिक्सर ट्रक येत होता. या परिसरातील मोठ्या झाडांना धडक दिली आणि त्यानंतर हडपसरच्या गाडीतळ परिसरातील उभ्या असलेल्या रिक्षांना कॉन्क्रिट मिक्सर ट्रक धडकला. या धडकेत रिक्षांचा चक्काचूर झाला आहे.
अपघातात रणजीत जाधव या रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून अनिल कुमार सिंग हा ट्रकचालक आणि मुन्ना सिंह क्लीनर याच्यासहित एक अनोळखी व्यक्ती जखमी आहे. कॉन्क्रिट मिक्सर ट्रक खाली अडकलेल्या रिक्षा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आल्या आहेत.