Latest Marathi News
Ganesh J GIF

बायकोच्या त्रासाला कंटाळून तलाठी पतीची आत्महत्या

व्हॉटसॲपवर स्टेटस ठेवत केली आत्महत्या, म्हणाले, पत्नीला माझा चेहरा दाखवू नका कारण...

अकोला – अकोला जिल्ह्यातील तेलहारा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील तहसील कार्यालयात तलाठी म्हणून काम करणाऱ्या शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘व्हाट्सअप’वर स्टेटस ठेवून त्यांनी आत्महत्या केली आहे.

शिलानंद तेलगोटे हे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत होते. शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसॲपवर एक स्टेटस ठेवले होते. त्यामधून तेलगोटे यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे. शिलानंद तेलगोटे यांनी मृत्यूपूर्वीच्या या स्टेटसमध्ये पत्नी आपला मानसिक छळ करत असल्याचे म्हटले आहे. माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, असेही तेलगोटे यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे. मी शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय 39, रा. तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा). मी दिनांक 30/03/2025 रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते. माझे पैसे तिचा भाऊ श्री. प्रवीण गायबोलेकडे असून, त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. सदर रक्कम मी लोण म्हणून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे. माझ्या मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझं पोस्टमार्टेम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. कारण आज मी पाच दिवस झाले, जेवण केलेलं नाही. माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल… कारण माझी पत्नी… असं त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे. तेलगोटे यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केलं होतं. यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे. दरम्यान तलाठी म्हणून काम करताना फेरफार प्रणाली मध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे काही काही वर्षांपूर्वी शिलानंद तेलगोटे यांचा आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सत्कार केला होता.

पोलिसांनी शिलानंद तेलगोटे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या पोस्टमार्टेम रिपोर्टवर पोलिसांचा पुढील तपास अवलंबून असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!