
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भयानक व्हिडिओ व्हायरल
गोळीचा आवाज, किंकाळी आणि धावपळ ह्रदय पिळवटून टाकणारे, धर्म विचारत गोळीबार, रेखाचित्र जारी
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैसन येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. दहशतवाद्यांनी अक्षरशः व्यक्तीचे नाव आणि त्याचा धर्म विचारात लोकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून आता या भयानक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
मागील सहा वर्षातील काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काश्मीरच्या दऱ्या दिसत आहेत, यात लोकांच्या किंचाळ्या देखील ऐकू येत आहेत. पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या दहशतवाद्यांनी पोलिसांचा बनावटी गणवेश परिधान करत लोकांवर हल्ला केला ज्यामुळे सुरुवातीला लोकांवर त्यांच्यावर संशय आला नाही मात्र काहीच क्षणात त्यांनी लोकांना त्यांची ओळख विचारली आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात एकूण ६ महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी, यांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला आहे. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हे या दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले आहेत. लष्कर-ऐ-तोयबाच्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या दहशतवादी हल्ल्यात तीन ते पाच दहशतवादी सहभागी होते, तर काही इतर स्थानिक लोकांनी मदतीची भूमिका बजावली असल्याचे सांगितले जात आहे. या दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे.
पर्यटनाचा भरात आलेला हंगाम आणि अमरनाथ यात्रेला एक महिना शिल्लक असताना जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला आहे. या हल्ला अमरनाथ यात्रा सुरु होण्याच्या एक महिनाआधी झाला आहे, त्यामुळे यात्रेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.