
गद्दारीचा विजय कधीच होत नाही लक्षात ठेवा , पुरावे माझ्याकडे ही आहेत ,अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा
उमेदवारी मिळाल्यावर वैयक्तिक टीका करायची नाही, राजकीय सुसंस्कृतपणा जपायचा, मी कोणत्याही परिस्थितीत पातळी सोडायची नाही, असे ठरवले होते. आणि अजूनही ते कसोशीने जपले आहे.पण अशा पद्धतीने जर पोरकटपणा दाखवत असाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा कधीच विजय होत नाही. पुरावे माझ्याकडे ही आहेत, असा इशारा महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी विरोधकांना दिला आहे. ते मंचरमध्ये बोलत होते.
विरोधकांना आव्हान देताना अमोल कोल्हे म्हणाले की, ज्या मंचर शहराला स्वर्गीय किसनराव बाणखेले यांच्या विचारांचा वारसा आहे, त्या शहरात विरोध करण्याचा पोरकटपणा, बालिशपणा करण्यात आला. हे गद्दार आहेत माहित होते, पण इतके भेकड आहेत हे माहीत नव्हते. स्टेज तुम्ही निवडा आणि समोरासमोर येऊन चर्चा करा आणि एकदा होऊनच जाऊ द्या.अमोल कोल्हे पुढे म्हणाले, कोविड काळात खासदार कुठे होते असे विचारणाऱ्या विरोधकांचे खरंच हसू येते. शिरूर तालुक्यातील पाच लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करून घेणारा अमोल कोल्हे हा देशातील पहिला खासदार होता. इतकेच नव्हे तर फॅबी फ्ल्यु या १०५ रुपयांच्या गोळीची किंमत चाळीस रुपयांनी कमी करणारा खासदारही अमोल कोल्हेच होता.
काही विरोधकांनी कोल्हे यांच्या प्रचारात मोदींच्या नावाने घोषणा देत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.यावर अमोल कोल्हे म्हणाले, घोषणा जर पंतप्रधान मोदींच्या नावाने देत असाल तर मग उमेदवारांनी याचे उत्तर द्यावे,त्या पंतप्रधानांच्या सरकारने आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यात बंदी लादली, दुधाचे भाव दहा-बारा रुपयांनी पडले,बिबट्याप्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फ्रेज लाईट का दिली जात नाही, हे विचारताना तुमचं तोंड का शिवले होते? असे सवाल कोल्हे यांना विरोधकांना केले.