
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पहिले कल यायला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप प्रणित एनडीए 295 जागांवर आघाडीवर आहे, यात भाजप 243 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी 217 जागांवर आघाडीवर आहे, ज्यात काँग्रेसला 94 जागांची आघाडी मिळाली आहे.दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये 23-23 जागांवर आघाडीवर आहे. यात भाजप 16 जागांवर, शिवसेना 5 जागांवर, राष्ट्रवादी 2 जागांवर ठाकरेंची शिवेसना 10 जागांवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 9 जागांवर आणि काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे.
उद्धव ठाकरेंना त्यांचा गड असलेल्या मुंबईमध्ये सुरूवातीच्या कलांनुसार मोठा धक्का बसताना दिसत आहे. दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव 1,172 मतांनी आघाडीवर आहेत. यामिनी जाधव यांना सुरूवातीला 8,286 मतं मिळाली आहेत, तर अरविंद सावंत यांना 7,114 मतं मिळाली आहेत. दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे 6,881 मतांनी आघाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम 8,093 मतांनी आघाडीवर आहेत. तर उत्तर मुंबईमधून भाजप उमेदवार पियुष गोयल आघाडीवर आहेत. तर उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरेंचे अमोल किर्तीकर आणि उत्तर पूर्व मुंबईत संजय दिना पाटील आघाडीवर आहेत.