Latest Marathi News
Ganesh J GIF

‘बार्शीमधील आगाऊ माणसांसाठी आठवड्यातून दोन तास वेळ देणार’

भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊतांचा आंधळकरांना टोला, चौकशीला सामोरे जाण्याचा निर्धार

बार्शी दि ३० (प्रतिनिधी)- बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना टोला लगावला आहे. राऊत यांच्या संपत्तीची चाैकशी होणार असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदराने पालन करणार,एक एक रुपयांचा हिशोब तोंड पाठ आहे.मी आणि माझ्या परिवाराने कष्टाने कमावलेली कमाई आहे. असे म्हणत तपास यंत्रणांना सहकार्य करणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपली भुमिका स्पष्ट करताना विरोधकांना टोले लगावले आहेत. ते म्हणाले बार्शीमधील आगाऊ माणसांसाठी आठवड्यातून दोन तास वेळ देणार आहे. विरोधकांनी किती लफडी केली,याचा लेखाजोखा बाहेर काढणार आहे. त्यांनी अनेक बँकांना बुडवले,अँटी करप्शनच्या जाळ्यात हेच अडकले होते, यांनी महावितरणची लाईट बिल देखील भरली नव्हती, बँकाकडून कर्ज काढत आम्ही व्यवसाय केलेत,तरी देखील आमच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे.आता मात्र गप्प बसणार नाही, असा इशारा राजेंद्र राऊत यांनी दिला आहे. यावेळी राऊत यांच्या टिकेचा रोख राऊत यांचे राजकीय विरोधक याचिकाकर्ते भाऊसाहेब आंधळकर यांच्यावर होता. आपण प्रामाणिकपणे व्यवसाय केल्याने सगळा हिशोब आपण तपास यंत्रणासंमोर सादर करु असेही राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

विरोधकांकडून माजी आमदार दिलीप सोपल यांच्या विरोधात देखील याचिका दाखल करण्यात आली होती.कालांतराने ही याचिका मागे घेण्यात आली,बहुतेक त्यांचा समाधान झालं वाटत.ही माणसे केवळ राजकीय स्वार्थासाठी कट कारस्थान करत आहेत. पण यांच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत असे म्हणत आंधळकरांवर दाखल गुन्ह्यांकडे लक्ष वेधले आहे. आता राऊत आणि आंधळकर यांच्यातील राजकारण कोण्यता मार्गाने जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!