![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
वैरिणी माता! जन्मदात्या आईने केली पोटच्या मुलांची हत्या
महिलेचा पतीवरही हल्ला, काैटुंबिक वादातून महिलेने उचलले टोकाचे पाऊल, कारण काय?
पुणे – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पोटच्या दोन चिमुकल्या लेकरांना आईनेचे पहाटे झोपेत गळा दाबून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच या महिलेने पतीवर देखील जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शंभू दुर्योधन मीढे, आणि पियू दुर्योधन मीढे अशी मृत मुलांची नावे आहेत. तर कोमल दुर्योधन मीढे असे हत्या करणा-या आईचे नाव आहे. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मीढे याच्यावर देखील हल्ला केला. पहाटेच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. दुर्योधन मिंढे एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहेत. सध्या ते घरातून काम करतात. त्यांची पत्नी कोमल शिक्षित आहे. मिंढे कुटुंबीय स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्ती भागात राहायला आहेत. पोलिसांनी कोमल दुर्योधन मिंढे या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे.
दुर्योधन मिंढे, त्यांची पत्नी कोमल उच्चशिक्षित आहेत. जखमी अवस्थेतील दुर्योधन यांना तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्वामी चिंचोली परिसरात शोककळा पसरली आहे.