विराट कोहली एकदिवसीय आणि टी २० मधून निवृत्ती घेणार?
विराट कोहलीच्या त्या निर्णयाने चर्चेला उधान, ज्योतिषाची ती पोस्ट व्हायरल, विश्वचषकातील पराभव जिव्हारी? चाहते चिंतेत?
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली अनेक विक्रम सर करत आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांचा विक्रम मोडला होता. तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील ५० शतके झळकवणारा पहिला खेळाडू ठरला होता. पण आता विराट कोहली मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे चाहते काळजीत पडले आहेत.
विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. पण या दरम्यान क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकीत करणारा निर्णय घेतला आहे. पण विश्वचषकातील अंतिम सामन्यात पराभव पत्कारावा लागल्यामुळे विराट कोहली वनडे आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. कारण कोहलीने सुरुवातीला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी २० मालिकेतून माघार घेतली होती. पण विराट कोहलीने आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यास नकारा कळवला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. असेही वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. ही बातमी समोर येताच क्रिकेट चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. काहींचं म्हणणं आहे की, विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटला रामराम करु शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे. कोहलीने बीसीसीआय आणि निवड समितीला सांगितले आहे की, तो व्हाईट बॉल क्रिकेटसाठी कधी उपलब्ध होईल याची माहिती तो स्वतः देईल. त्यामुळे कोहलीने व्हाईट बॉल क्रिकेटपासून दूर जाण्यास सुरूवात केली असल्याचा कयास लावला जात आहे. त्यामुळे हा ब्रेक काही काळासाठी असणार की आपला निर्णय कायम ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यातच विराट कोहलीबाबत एका ज्योतिषाची भविष्यवाणी व्हायरल होत आहे. या ज्योतिषाने विराट कोहलीबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये कोहली मार्च २०२८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. या पोस्टमध्ये विराटच्या खराब फॉर्मपासून त्याच्या दमदार कमबॅकपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर या पोस्टमध्ये विराट कोहलीच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक अंदाज वर्तवण्यात आले होते. सध्याच्या काळात विराट कोहलीच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे विराट कोहली कोणता निर्णय घेणार यावरून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.
— ` (@musafir_tha_yr) November 21, 2023
विराटने २००८ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत २९२ एकदिवसीय सामन्यांच्या २८० डावांमध्ये ५० शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विश्वचषकातील एकदिवसीय शतकांचा विक्रमही मोडीत काढला. मात्र, दोन वर्षांपूर्वी खराब फॉर्ममुळे कोहलीला टीकेला सामोरे जावे लागले होते.