Latest Marathi News
Ganesh J GIF

रस्त्याने चालले होते पण अचानक घडलं असं की सारेच संपले

थरारक घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, चूक कोणाची सजा कोणाला? , तुमचाही थरकाप उडेल?

मुंबई – महाराष्ट्रात हा आठवडा अपघात आठवडा म्हणून चर्चेत आला आहे. कारण या आठवड्यात वेगवेगळ्या अपघातात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. पण सध्या एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. तो पाहून आपलाही थरकाप उडेल.

नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी परिसरात हिट अँड रन अपघात घडून आला ज्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक महिला रस्त्याच्या कडेला चालत होती आणि एक तरुणही त्याच वाटेने जात होता. अचानक मागून भरधाव वेगात एक कार येते आणि दोघांनाही इतकी जोरात धडकली की ते लांबवर जाऊन पडतात. या अपघातात लालू दास यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रमिला दास यांना गंभीर जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे यात काही क्षणापुर्वी दोघांना आपल्यासोबत असे होईल असे वाटत देखील नसेल पण कोणतीही चूक नसताना त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. या थरारक अपघाताचा व्हिडिओ @siraj noorani नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. हिट अँड रन प्रकरणी आरोपी कार चालकाला तळोजा पोलिसांनी अटक केली असून पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे.

https://x.com/sirajnoorani/status/1879291479958712809

अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच यात आणखीन एका घटनेचा समावेश झाला. लोक गाडी चालवताना रस्ते नियमांचे पालन करत नाहीत आणि यामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकत असतात. पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताची राज्यात चर्चा झाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!