Latest Marathi News
Ganesh J GIF

विधानसभेला बाहेरून 20 हजार मतदार आणले आणि जिंकलो

शिंदे गटाच्या आमदारांची जाहीर कबुली, शिंदेंनी डोळे वटारताच सूर बदलला, वक्तव्य आमदारांचे कोंडी शिंदेंची, नेमके काय घडले?

छत्रपती संभाजीनगर – राहुल गांधी वारंवार मतचोरीचा दावा करत मोठमोठे खुलासे करत आहेत. त्यावर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हा दावा फेटाळत असतात. पण आता शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी बाहेरून मत आणल्यामुळे आपण जिंकलो, अशी जाहीर कबुली देत, भाजपप्रणित महायुतीची कोंडी केली आहे, विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासमोर हे विधान केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगरयेथे गटनेत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात स्वत: एकनाथ शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना पैठणचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण केले. यावेळी त्यांनी बोलण्याच्या नादात म्हटले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण मतदार यादीवर काम केले पाहिजे. मी विधानसभेला 20 हजार मतदान बाहेरून आणले. पण यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विलास भुमरेंना इशारा करताच त्यांनी आपल्या विधानात सुधारणा केली. त्यावेळी ते म्हणाले की, मतदान बाहेरून आणले म्हणजेच स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळेस आणले असा खुलासा विलासा भुमरेंनी केला. पण यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. आपल्या गावातील आपल्या मतदारसंघातील किती मतदार बाहेरगावी स्थलांतरीत झालेले आहेत, आपण याच्या याद्या केल्या पाहिजेत, असा सल्लाही त्यानंतर विलाम भुमरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.विलाम भुमरेंनी जेव्हा सांगितलं की, मी २० हजार मतदान बाहेरुन आणलं तेव्हा व्यासपीठावरील संदीपान भुमरे, एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट हे तिघेजण हसत होते. पण नंतर हा विषय गंभीर असल्याचं लक्षात येताच एकनाथ शिंदेंनीच विलास भुमरेंना मध्येच थांबवावं लागलं, त्यामुळे शिंदे आमदारांच्या बेतालपणामुळे वैतागले असल्याचे सूचित होत होते. कारण शिवसेनेच्या एकामागून एक मंत्र्यांकडून आणि आमदारांकडून अशा पद्धतीनं अडचणीत आणणारी विधानं केली जात आहेत. शिंदे यांनी इशारा देऊनही अशी विधाने होत असल्यामुळे शिंदे यांचा आमदारांवर वचक नसल्याची चर्चा होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस आणि अन्य विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून मतचोरीचा आरोप करण्यात येत आहे. हेच मतचोरीचे आरोप करताना काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याचे पुरावे सुद्धा सादर केले आहेत. पण आता भुमरे यांच्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!