Just another WordPress site

‘ज्यांच्यासोबत आमच लफडं त्यालाच आम्ही लव्ह यू म्हटलं’

शिंदे गटाच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान आदित्य ठाकरेंवरही निशाना

जळगाव दि ५ (प्रतिनिधी)- ज्यांच्यासोबत आमचं २५ वर्ष लफडं होतं, त्याला आम्ही आय लव्ह यू म्हटलंयांच्यासोबत आमचं २५ वर्ष लफडं होतं, त्याला आम्ही आय लव्ह यू म्हटलं, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेतील लव्ह यू डायलाॅगची पुनरावृत्ती केली आहे. जळगावमधील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी करत आदित्य ठाकरेंवरही जोरदार टिका केली आहे.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “आमदार होण सांध झालं राहिलेले नाही, पहिल्या वेळी कुणीही आमदार होते मात्र पुन्हा आमदार होणं कठीण असते, पब्लिक है ये सब जानती आहे, हे लोक आता वेड बनणार नाहीत. ज्याप्रमाणे भाजीपाला घेतांना तो निवडून घेतात त्याप्रमाणे पाच वर्षांसाठी हे आमदार निवडतात. आता मंत्रिमंडळात दोन महिने गॅप पडला असे म्हणत काय झाडी काय डोंगर, पन्नास खोके एकदम ओके अशा पद्धतीने आमच्यावर टीका केली जाते. मी इथं राष्ट्रवादी, काँग्रेसवर टीका करायला आलेला नाही, कारण मागचे अडीच वर्ष आमचं त्यांच्यासोबतच लफडं होतं. आम्ही राजकारणाचा सट्टा खेळलो, जर झालं नसत तर राम बोलो भई राम असा आमचा कार्यक्रम झाला असता, आता ज्यांच्यासोबत आमचं २५ वर्ष लफडं होतं, त्याला आम्ही आय लव्ह यू म्हटलं’ असे सांगत पाटील यांनी भाजपासोबत जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.

GIF Advt

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आमच्यावर टीका होत आहे. पण ३५ वर्षापासून झेंडा लावणारे आम्ही, मार खाणारे आम्ही, तडीपार होणारे आम्ही.. जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ३२ वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतोय. मात्र तू गोधडीत पण नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असे म्हणत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना डिवचल आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!