Latest Marathi News
Ganesh J GIF

आपल्याला या काळात ताणतणाव आल्यासारखे वाटते पण..

प्रसिद्ध अभिनेत्रीचे वक्तव्य चर्चेत, नवरात्र काळातील आठवणी सांगताना अभिनेत्री भावुक म्हणाली,दोघीही खूप खमक्या...

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरला ओळखले जातात. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतुन ते घराघरात पोहोचले होते. आणि या ठिकाणीच त्यांची प्रेम कहाणी फुलली. आणि त्यांनी थेट एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेत लग्न देखील केले. विशेष म्हणजे पाठक बाई ही भूमिका साकारुन नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधरने आपल्या सारसविषयी एक वक्तव्य केले आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

महाराष्ट्रात सध्या नवरात्रातीची धुम पहायला मिळत आहे. कारण सर्व ठिकाणी देवीचा जागर होत आहे. अक्षयाने नवरात्रीनिमित्त छान फोटो आणि व्हिडीओ शूट केले आहेत. याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. पण त्याचवेळी अक्षयाने आपल्या सासर विषयी महत्वाचे विधान केले आहे. ती म्हणाली की, माझ्या माहेरी नवरात्र नसते. पण सासरी नवरात्र साजरी केली जाते. आमच्याकडे घट बसतात. त्यामुळे माझं यंदाचं नवरात्र अनुभवण्याचं पहिलंच वर्ष आहे. माझ्या आई आणि सासूबाई दोघीही सारख्याच आहेत, असं मला वाटतं. त्या दोघीही खूप खमक्या आहेत. त्या दोघीही सर्वच गोष्टींवर मात करु शकतात, त्यांच्याकडून मला ती उर्जा घ्यावी असे कायम वाटते. माझ्यासाठी ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. आपल्याला या काळातही ताणतणाव आल्यासारखं वाटतं. पण त्या दोघीही कमाल आहेत, असं मला कायमच वाटते अशा शब्दात अक्षयाने आपल्या सासूविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. मध्यंतरी ही जोडी एका गिफ्टमुळे चर्चेत आली होती. हार्दिकने अक्षयाला आयफोन १५ प्रो मॅक्स भेट म्हणून दिला होता. याविषयी एक पोस्ट करत अक्षया म्हणाली होती की, ‘उठले तोच आयफोन 15 प्रो मॅक्स’शेजारी, तळटीप : फक्त आयफोन लव्हरच 1TB चं महत्व जाणून घेऊ शकतात’. अक्षया व हार्दिक यांच्यात असलेलं बॉण्डिंग नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत. या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायला प्रेक्षकही आतुर आहेत. सध्या अक्षया लग्नाच्या पहिल्या वर्षाचा आनंद साजरा करताना दिसत आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका संपल्यानंतर अक्षयाने आपलं स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अक्षयाने याची माहिती दिली होती. या यूट्यूब चॅनेलवर अक्षया आपल्या दैनंदिन घडामोडींचे व्हिडीओ अपलोड करत असते. पण अक्षयाला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!