
‘अजितदादांना उघडनागडं केल्याशिवाय शांत बसणार नाही’
देवेंद्र फडवणीस यांच्या जवळच्या नेत्याची अजित पवारांवर जहरी टीका, फडणवीसांनाही घेरले
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसापासून विविध घडामोडी घडत आहेत. रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
गेल्या आठवड्यापासून लक्ष्मण हाके हे अजित पवारांवर टीका करत आहे. यावरून हाके आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात जुंपली आहे. दोघेही एकमेकांवर शेलक्या शब्दात टीका करत आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हाके म्हणाले की, अमोल मिटकरी आम्हाला क्रिमिनल जाती म्हणतात. सुरुवात अमोल मिटकरीने केली आणि शेवट आम्ही करणार आहोत. मी काही पवार कुटुंबासारखा व्यापारी नाही, माझा कुठं कारखाना नाही किंवा रोहित पवार यांच्यासारखी बारामती ऍग्रो नाही. अजितदादा पवार यांच्याबदल मंत्रिमंडळात नाराजी आहे. माझे भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विचारणे आहे की, लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली. हा काय न्याय आहे?’सारथीला निधी मिळतो महाज्योतील मिळत नाही, या संदर्भात मी अर्थमंत्र्यांना उद्देशून एक पत्रकार परिषदे केली. तेव्हा अमोल मिटकरी यांनी वाय झेड नंबर याच्या गाडीचा नंबर ठेवा, अशी टीका माझ्यावर केली. सूरज चव्हाण याने तुझ्या पार्श्वभागावर वाय झेड उमटवतो, अशी टीका केली. खूप खालच्या स्तरावर टीका माझ्यावर करण्यात आली.’ पण यावेळी अजित पवार यांच्यावर टीका करताना, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार हे चोरांचे, कारखानदारांचे आणि दरोडेखोरांचे सरदार आहेत. मी त्यांना उघडनागडं केल्याशिवाय शांत बसणार नाही’, अशा जहाल शब्दात हाके यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान तसेच भाजपने आधी अजित पवारांना सोबत घेतले. आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना का घेत आहेत, त्यांना बाहेर थांबू द्या, असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
अजित पवारांना एखादा व्यवसाय करावा असेही हाके म्हणाले. सामाजिक न्याय आणि अजित पवारांचा काहीही संबंध नाही. एकाही ओबीसी वसतिगृहासाठी त्यांनी निधी दिलेला नाही असा आरोप लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.