मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमकपणे टीका केली जात आहे. कंबोज यांचे ट्विट म्हणजे भाजपाने अजित पवार यांना दिलेला इशारा असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत पण आता राष्ट्रवादीनेही कंबोजवर जोरदार टिका केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना थेट इशारा दिला आहे. ‘मोहित कंबोज यंत्रणेला हाताशी धरून धमकी कोणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो. तुझी सत्तेची मस्ती आणि माज उतरावयला वेळ लागणार नाही. आ देखे जरा किसमें कितना है दम’, अशा आशयाचे ट्विट करत कंबोज याला इशारा दिला आहे. कंबोजने राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल, असा इशारा कंबोज यांने दिला होता. त्यावरूनच जोरात राजकारण सुरु आहे. भाजप राष्ट्रवादीवर दबाव टाकत असल्याची चर्चा आहे.
मोहित कंबोज यंत्रणेला हाताशी धरून धमकी कोणाला देतोय ? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो. तुझी सत्तेची मस्ती आणि माज उतरावयला वेळ लागणार नाही.
आ देखे ज़रा किसमें कितना है दम ।@mohitbharatiya_— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) August 17, 2022
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांवरून शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत असतानाच भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटने विरोधकांना बॅकफुटवर टाकले आहे.कंबोकच्या ट्विटनंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.