कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार? यादी आली
यादीत बघा तुमच्या जिल्ह्यात कोण झेंडा फडकवणार
मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- शिंदे- फडणवीस सरकारने अद्याप कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्री नेमले नसल्याने यंदाच्या स्वातंत्र्यदिनी कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करायचे हा प्रश्न होता, पण आता हा तिढा सोडवण्यात आला आहे. मुख्यमंत्री हे मुंबईतच शासकीय ध्वजारोहण करणार आहेत तर इतर १९ मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांसह २० मंत्री असल्याने इतर सोळा जिल्ह्यांत विभागीय आयुक्त किंवा संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपापल्या जिल्ह्यात हे मंत्री ध्वजारोहण करणार आहेत. त्यामुळे १९ जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित झाले आहेत का? कि ही फक्त तात्पुरती सोय आहे याची उत्सुकता राहणार आहे.पुण्याचे पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. पण फडणवीस हे नागपूर मध्ये तर चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करणार आहेत.
पाहूया कोण कुठे ध्वजारोहण करणार आहे.
देेवेंद्र फडणवीस- नागपूर
सुधीर मुनगंटिवार-चंद्रपूर
चंद्रकांत पाटील-पुणे
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर
गिरीश महाजन- नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील- जळगाव
रवींद्र चव्हाण-ठाणे
मंगलप्रभात लोढा-मुंबई उपनगर
दीपक केसरकर-सिंधुदुर्ग
उदय सामंत-रत्नागिरी
अतुल सावे-परभणी
संदिपान भुमरे-औरंगाबाद
सुरेश खाडे-सांगली
विजयकुमार गावित-नंदुरबार
तानाजी सावंत-उस्मानाबाद
शंभूराज देसाई सातारा
अब्दुल सत्तार-जालना
संजय राठोड-यवतमाळ
अमरावती येथे विभागीय आयुक्त
कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या ठिकाणी तेथील जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.