दिल्ली दि १६ (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनीही दावा केला आहे. त्याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालय देणार आहे. ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा यांनी घेतला आहे. हा ठाकरे गटाला मोठा दिलासा आहे.

निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्षाबाबत १९ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. यासंबंधीची कागदपत्रे सादर करण्यासाठी शिवसेनेने चार आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांना फक्त १५ दिवसांची मुदत देऊ केली होती. निवडणूक आयोगाची पुढील सुनावणी पुढील १९ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे १९ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेण्याची विनंती ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाने केली होती. पण त्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा पुढील निर्णय येत नाही तोवर निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.असे न्यायालयाने आधीच स्पष्ट केले आहे.शिंदे गटाने मात्र निवडणूक आयोगाला निर्णय घेऊ द्या अशी मागणी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी उठाव करत, ठाकरे सरकार खाली खेचले. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.