
प्रियकरासाठी झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीने केली पतीची हत्या
प्रेमात अडथळा ठरतल असल्याने पत्नीने प्रियकरसोबत काढला पतीचा काटा, हृदयविकाराचा बनाव फसला आणि....
हैद्राबाद – तेलंगणाच्या हैदराबादमध्ये पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. आरोपी पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृणपणे हत्या केली आहे. विशेष म्हणजे तिचा पतीच्या निधनाचा प्रयत्न फसला आहे.
जेलेला शेखर असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. आरोपी पत्नीचं नाव चिट्टी आणि तिच्या प्रियकराचं नाव हरीश आहे. जेलेला शेखर हा त्याची पत्नी चिट्टीसोबत हैदराबाद शहरातील सरूरनगर येथील कोडंडराम नगरमध्ये राहत होता, त्या दोघांचं १६ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, त्यांना २ मुलंही आहे. शेखर हा कॅब ड्रायव्हर होता. टॅक्सी चालवायचे काम करायचा. त्यामुळे तो जास्तवेळा घराबाहेर असायचा. त्यामुळे चिट्टीचा हरीश नावाच्या व्यक्तीशी संपर्क आला. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली, आणि त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले. तिच्या पतीला यांची माहिती झाल्यानंतर त्याने चिट्टीला बजावले. पती आपल्या प्रेमात अडथळा ठरतल असल्याचे चिट्टी आणि प्रियकर हरीशला समजलं, आणि त्यांनी त्याचा काटा काढण्याचा, त्याला मारण्याचा कट रचला. पती कामावरून परतल्यानंतर तो जेवून झोपला. तो गाढ झोपेत असताना चिट्टीने हरीशला फोन केला आणि तिच्या घरी बोलावलं. पती झोपेत असतानाच दोन्ही आरोपींपैकी एकाने त्याचा गळा दाबला आणि दुसऱ्याने त्याच्या डोक्यावर दांडक्याने वार केले. हत्येचा संशय येऊ नये म्हणून चिट्टीने पोलिसांना कॉल करून पतीच्या मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर सरूरनगर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि जेलेलाला घेऊन ते रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. पतीला हृदयविकाराचा झटका आला होता आणि गाढ झोपेत असताना त्याचा मृत्यू झाला, असं तिने पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला.
प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीची हत्या केल्याची कबुली चिट्टीने दिली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, दोघांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून चिट्टीला अटक करण्यात आली आहे, तर फरार प्रियकर हरीशचा पोलीस शोध घेत आहेत.