
लग्नाच्या दुस-याच दिवशी पत्नीने केली पतीची हत्या
अनिरुद्ध महाराजांचा तो व्हिडिओ ठरला हत्येचे कारण, प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या
लखनऊ – उत्तरप्रदेशच्या कुशीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दागिने आणि दीड लाख रुपयांसाठी एका शिक्षकाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या पत्नीसह दोघांना अटक केली आहे.
हत्या झालेल्या शिक्षकाचं नाव इंद्र कुमार तिवारी आहे. अनिरुद्धाचार्य यांच्या प्रवचनातील एका व्हायरल व्हिडीओमुळे त्याची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अनिरुद्धाचार्य यांनी जबलपूरमधील रीमझा गावात मेमध्ये कथावाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात तिवारी यांनी माझ्याकडे १८ एक्कर जमीन आहे, पण माझे लग्न होत नाही” असं त्याने सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर साहिबा बानो उर्फ खुशी तिवारी आणि तिचा साथीदार कौशल गौड यांनी इंद्र कुमार तिवारीची जमीन हडपण्याचा कट रचला बानोने आपले नाव खुशी असल्याचे सांगत तिवारींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. इंद्र कुमारचा विश्वास बसावा यासाठी तिने खुशी तिवारी नावाने फेसबूक खातेही उघडले. इंद्र कुमार देखील लग्नासाठी तयार झाला. कुटुंबाचा विरोध असूनही इंद्रकुमारने खुशीबरोबर जूनमध्ये लग्न केले. ५ जून रोजी एका मंदिरात इंद्रकुमार आणि खुशी यांचा विवाह झाला. मात्र, सुहागरातच्या रात्री कौशल आणि साहिबाने मिळून इंद्रकुमारवर चाकूने हल्ला केला. यावेळी त्याच्या पोटात आणि गळ्यावर वार करण्यात आले. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह कुशीनगरच्या हाटा कोतवाली परिसरातील एका शेतशिवारात फेकला. यावेळी साहिबा आणि कौशने इंद्र कुमार जवळील दागिने आणि १.५ लाख रुपये लंपास केले. इंद्रकुमारच्या हत्येनंतर कुणालाही संशय येऊ नये म्हणून साहिबाने तीन दिवस त्याच्या कुटुंबाशी संपर्क ठेवला. मात्र, काही गेल्या पाच ते सहा दिवसांपासून इंद्रकुमारशी संपर्क होत नसल्याने पोलिसांत तक्रार दिली. २७ जून रोजी कुशीनगर येथील उपासपूर गावात एक अज्ञात मृतदेह सापडल्याची माहिती जबलपूर पोलिसांना देण्यात आली. जबलपूर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता तेच इंद्रकुमार असल्याचे लक्षात आले. मात्र इंद्रकुमार यांच्याकडील दागिने, पैसे आणि त्यांचा मोबाइल आढळून आला नाही. यामुळे हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलीस तपासांत ही संपू्र्ण घटना उघडकीस आली. याप्रकरणी आता पोलिसांनी बानो या महिलेसह दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश केला आणि खुशीसह कौशलला अटक केली. कौशल आणि खुशी हे बहीण-भाऊ नव्हते तर पती-पत्नी होते. खुशीचं कौशलसोबत लग्नाआधीचं नाव शाहिदा होतं. कौशलसोबत लग्नासाठी शाहिदाने धर्म बदललेला. त्यानंतर तिनं खुशी हे नाव ठेवलं होतं. तेच नाव इंद्रकुमारशी बोलताना वापरलं होतं.