
लग्नाच्या दीड महिन्यातच पत्नीने केली पतीची हत्या
ओैरंगाबाद हादरले, शार्प शुटरची मदत, आत्याच्या पतीसोबत अनैतिक प्रेमसंबंध, मोबाईलमधून धक्कादायक सत्य समोर
ओैरंगाबाद – बिहारमधल्या औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवविवाहितेनंच आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची हत्या केली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रियांशु कुमार सिंह असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर गुंजादेवी सिंग असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. यात तिची मदत करणाऱ्या महेंद्र चौबे आणि रामाशिष शर्मा अशी अटक केलेल्या इतर दोघांची नावं आहेत. विशेष म्हणजे हा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून, आरोपी महिलेचा मामा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशु आणि गुंजादेवी यांचं लग्न ४५ दिवसांपूर्वीच झालं होतं. पण गुंजाचे आत्याच्या पतीसोबत म्हणजे मामासोबत मागील १५ वर्षापासून संबंध होते. लग्नानंतर प्रियांशुला याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याने यावर आक्षेप घेत पत्नीला परत असे न करण्याबाबत समज दिली. दोघांचे बोलने होत नसल्यामुळे ते अस्वस्थ होत होते. एकदा प्रियांशुने गुंजाचा मोबाईल पाहिला तेंव्हा त्यात तेव्हा गुंजाने तिच्या काकाशी व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरू केले. तिच्या काकाच्या सूचनेनुसार, गुंजा तिच्या मोबाईलवरून तिचे अश्लील फोटो त्याच्या मोबाईलवर पाठवत होती. आपले बिंग फुटत आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रियांशुचा काटा काढायचे ठरवले. २४ जून रोजी संध्याकाळी हत्येची योजना आखण्यापूर्वी, गुंजा तिच्या काकाशी मोबाईलवर अनेक वेळा बोलली होती. हत्येची योजना आखल्यानंतर, गुंजाने प्रियांशुला चंदौली येथील तिच्या चुलत भावाच्या घरी जाण्यास सांगितले होते. चंदौलीहून घरी परततानाही गुंजाचे तिच्या काकाशी हत्येबद्दल अनेकदा बोलणे झाले होते आणि योजनेनुसार, नबीनगर रेल्वे स्टेशनवरून घरी परतत असताना डाल्टनगंजहून आलेल्या दोन शूटरनी गोळी घालून हत्या केली. दरम्यान गुंजाच्या आत्याचा नवरा जीवन सिंह याचे राजकीय संबंध अनेकांशी चांगले आहेत. ट्र्रॅव्हल बसेसचा त्यांचा व्यवसाय आहे. तसंच त्याचं एक बाईक शो रुम आहे.
पोलिसांनी या हत्येच्या आरोपात प्रियांशुची पत्नी गुंजादेवीसह एकूण तिघांना अटक केली आहे. महेंद्र चौबे आणि रामाशिष शर्मा अशी अटक केलेल्या इतर दोघांची नावं आहेत. पोलिसांनी मामाचीही चौकशी केली. पण हत्येमध्ये पुरावे न मिळाल्याने त्यांना अभय मिळाले आहे.