Just another WordPress site

अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

सोलापूर पोलीसांनी शिताफीने सापळा रचत आरोपींना एका दिवसात केली अटक

सोलापूर दि २४(प्रतिनिधी) – अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचत थंड डोक्याने पतीचा खून केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. पण पोलीसांनी शिताफीने तपास करत २४ तासातच आरोपींना अटक केली आहे.

GIF Advt

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे गावचा राहिवशी असलेला दशरथ नारायणकर हा काही वर्षापूर्वी सोलापुरात राहायला आला होता. मृत दशरथ हा त्याची पत्नी अरुणा आणि मुलीसोबत जुना विडी घरकुल परिसरातील केकडे नगरात राहत होता. त्याची पत्नी अरुणाचे बाबासाहेब बाळशंकर या तरुणासोबत सात-आठ वर्षापासून प्रेमसंबंध होते.घटनेच्या दिवशी दोघांनी दशरथला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवले आणि दोघांनी दोरी आणि चाकूची खरेदी केली होती. ठरल्याप्रमाणे पहाटे तीनच्या सुमारास महिलेच्या प्रियकराने घरात शिरून तिच्या पतीचा खून केला. पतीचा खून केल्यानंतर पत्नीनेच एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. मात्र, तिचा आणि तिच्या प्रियकराचा प्लन पोलिसांनी काही तासातच उघड केला. गुन्हे शाखेच्या तपासा पथकाने आरोपीला काही तासांतच पकडले. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.

पोलीसांनी सुरवातीला आर्थिक व्यवहारातून दशरथचा खून झाल्याचा पोलिसांना संशय होता. पण पोलिसांना घटनेच्या दिवशी बाबासाहेब बाळशंकर तिथे आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांनी सापळा रचत त्याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने बाळशंकर याला ताब्यात घेतले. त्याने अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!