Latest Marathi News
Ganesh J GIF

बिहारमध्ये चमत्कार घडणार? ‘हा’ पक्ष निवडणुकित माजी मारणार

निवडणूकीचा ओपिनियन पोल समोर, अनेक उलटफेर घडणार? हा पक्ष ठरणार किंगमेकर, पहा कोणाला किती जागा मिळणार?

दिल्ली – सगळ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. मागील अनेक वर्षांपासून नितीश कुमार भाजपसोबत सत्ता राखण्याचा प्रयत्न करणार आहेत तर लालूंचा पक्ष सत्ता परत मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत.

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. तर बहुमतासाठी एकूण १२२ जागांची आवश्यकता असते. टाईम्स नाऊ आणि जेव्हीसीने केलेल्या सर्व्हेमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व्हेमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला १३० ते १५० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला ८१ ते १०३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांच्या पक्षाला ४ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. पक्षाचा विचार केल्यास भाजपा ६६ ते ७७ जागा मिळण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल(युनायटेड)ला ५२ ते ५८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. लालूंच्या राजदला ५७ ते ७१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ११ ते १४ जागांवरच विजय मिळण्याची शक्यता आहे. इंडिया ब्लॉकमधील इतरांना १३ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय, मायावतींची बसपा आणि इतरांना मिळून ५ – ५ जागा मिळतील, असा अंदाज सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सध्यातरी भाजप प्रणित एनडीए पुन्हा बहुमताने सत्तेत येण्याची शक्यता आहे.

निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच बिहारमध्ये वातावरण तापलेलं आहे. येथे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज बांधला जात आहे. निवडणूक आयोग नवरात्र संपल्यानंतर कधीही पत्रकार परिषद घेत निवडणूकांची घोषणा करू शकते, त्यामुळे अनेक पक्ष पूर्ण तयारी करून सज्ज आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!