
जालना प्रतिनिधी – शिवसेनेच्या नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा का भाजप मध्ये जायचे जणू स्पर्धा सुरू असल्याचे चित्र राज्यात दिसत असताना जालना जिल्ह्यातील शिवसेना मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे आजवरचे चित्र होते.मात्र, घनसावंगी तालुक्यातील काही शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातही बंडखोरी उदयास आल्याचे दिसून आले. दरम्यान, शिवसेनेचे उपनेते माजीमंत्री अर्जुन खोतकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत दोनवेळा भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून मंगळवार ( दि. 26 ) काही वृत्तवाहिन्यांवर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली. खोतकर हे शिंदे गटात सामील का भाजप मध्ये जाणार असे खुद्द माजी मंत्री अर्जुन खोतकर याच्याकडुन बातम्यांमध्ये सांगण्यात आले.लगोलग भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही माध्यमांशी राजकारण कोणी कोणाचे शत्रू नसते अशा आशयाची सूचक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा वृत्ताला एकप्रकारे पुष्टी मिळाली.
दरम्यान, असे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी शिवसेनेला रामराम ठोकून शिंदे गटाचा रस्ता धरला तर मराठवाड्यातही शिवसेनेला मोठा धक्का बसेल ,असे मानले जात आहे. त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यामुळे दानवे – खोतकर यांच्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई करून दोघांत ‘समेट’ घडवून आणला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या शक्यतेला मंत्री दानवे यांच्या प्रतिक्रियेमुळे दुजोरा मिळाला आहे. दरम्यान, जालना सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदा लिलावाशी संबंधित प्रकरणात ‘ईडी’ने कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री, जमीन आदी जप्त केली असल्याची माहिती ‘ईडी’ने दिली होती. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी या साखर कारखाना खरेदीत शंभर कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालना – औरंगाबाद येथे काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर ईडीने खोतकर यांच्यावर ही कारवाई केली होती. तथापि, शिंदे गटाचे बंडाचे नाट्य सुरू असतानाच जालन्यात ईडीने जालना सहकारी करण्याची मालमत्ता जप्तीची कारवाई केली.त्यामुळे ईडीच्या कारवाईची खोतकरांवर टांगती तलवार होती. अशातच राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपच्या मदतीने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले. त्यातच अर्जुन खोतकर हे दिल्ली येथे काही वयक्तिक कामानिमित्त गेल्याचे सांगण्यात आले असून कामातकाम म्हणून खोतकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय गोटात एकच खळबळ माजली. एकूणच, याविषयी स्वतः अर्जुन खोतकर आपली भूमिका केव्हा मांडतात याकडे लक्ष लागले आहे.
शिदे गटात की भाजप मध्ये जालन्यात निर्णय घेणार – खोतकर
माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिंदे गटात जाणार की भाजपमध्ये जाणार या चर्चेला दोन दिवसापासून उद्यान आला आहे मात्र माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी जालना लोकसभाची मागणी देखील दानवे यांच्याकडे केली माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांना लोकसभा लढवण्यासाठी भाजप शिवाय पर्याय नाही जालना आल्यावर निर्णय घेतल्या जाईल अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी माध्यम अशी बोलताना दिली