
यामुळे डान्सर गौतमी पाटीलला अटक होणार?
त्या सीसीटीव्ही फुटेजमुळे गौतमी पाटील अडचणीत, या कॅबिनेट मंत्र्यांचे पोलिसांना आदेश म्हणाले गौतमीला उचला...
पुणे – पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात कार आणि ऑटो रिक्षाचा अपघात झाला. ही कार अभिनेत्री गौतमी पाटील यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. गौतमीच्या कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याने रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि रिक्षाचालक जखमी झाला. पण आता त्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे.
रिक्षा अपघात प्रकरणात लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील अडचणीत सापडली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विषयात डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत गौतमी पाटीलला उचलायचं की नाही अशी विचारणा केली आहे. जखमी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांच्या कुटुंबीयांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि गौतमी पाटीलला अटक करावी अशी मागणी केली. त्यांनी थेट सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली आहे. तसेच, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी कुटुंबीयांकडून पोलिसांकडे करण्यात आली आहे. थेट चंद्रकांत पाटील यांनी फोन केल्यामुळे गौतमी पाटीलला अटक होण्याची शक्यता आहे. धडक देणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पण या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास होत नाही असा आरोप जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केला. या नातेवाईकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन करून प्रकरणाची माहिती घेतली. या वाहनात गौतमी पाटील होती की नव्हती, संबंधित चालकाला अटक करा, वाहन जप्त करा असं चंद्रकांत पाटलांनी पोलिसांना सांगितले. त्याशिवाय रिक्षाचालकाच्या उपचाराचा खर्च गौतमीला करायला लावा असंही पाटील यांनी म्हटले आहे. या अपघातानंतर कारचालक फरार झाला होता मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली आहे. दरम्यान, ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली ते वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणी आता गौतमी पाटीलला चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे, असे या नोटीसमध्ये बजावण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान ज्या कारमुळे अपघात झाला ती गौतमी पाटीलची होती. त्यामुळे तिला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
गौतमी पाटीलला अटक करावी, अशी मागणी करत रिक्षाचालकाचे कुटुंबीय थेट सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. त्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज द्यावेत, अशी मागणीही कुटुंबियांकडून पोलिसांकडे केली जात आहे. गौतमी पाटीलने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणीही रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.